अ‍ॅपशहर

तहसीलदारही झाले हायटेक

प्रत्येक शेतकऱ्यांना त्यांच्या मागणीनुसार सहज व सुलभपणे संगणकीकृत सातबारा तसेच आठ अ यांसारखे आवश्यक असलेले दस्तऐवज उपलब्ध करून देण्यासाठी पटवाऱ्यांसोबतच तालुका स्तरावर नायब तहसीलदारांना लॅपटॉप उपलब्ध करून देण्याचा अभिनव उपक्रम जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांच्या हस्ते डाटाबेस अधिकारी म्हणून नायब तहसीलदारांना लॅपटॉपचे वितरण करण्यात आले.

Maharashtra Times 11 Aug 2017, 4:00 am
नागपूर : प्रत्येक शेतकऱ्यांना त्यांच्या मागणीनुसार सहज व सुलभपणे संगणकीकृत सातबारा तसेच आठ अ यांसारखे आवश्यक असलेले दस्तऐवज उपलब्ध करून देण्यासाठी पटवाऱ्यांसोबतच तालुका स्तरावर नायब तहसीलदारांना लॅपटॉप उपलब्ध करून देण्याचा अभिनव उपक्रम जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांच्या हस्ते डाटाबेस अधिकारी म्हणून नायब तहसीलदारांना लॅपटॉपचे वितरण करण्यात आले.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम tahsildar becomes hitech
तहसीलदारही झाले हायटेक


यावेळी उपजिल्हा नियोजन अधिकारी राजू कळमकर, उपजिल्हाधिकारी रविंद्र खजानजी, तसेच एनआयसीच्या क्षमा बोरोले आदी उपस्थित होते. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीचा संगणकीकृत सातबारा देण्याचा विशेष उपक्रम जिल्हयात राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत ४२६ पटवाऱ्यांना, ७० मंडळ अधिकाऱ्यांना लॅपटॉप देण्यात आले. तलाठी तसेच मंडळ अधिकारी यांच्या मध्ये समन्वयासोबत संगणकीकृत सातबारा नियंत्रण व वितरण अधिकारी म्हणून नायब तहसीलदार यांनाही लॅपटॉप उपलब्ध करून देणे आवश्यक होते. डाटाबेस अधिकारी म्हणून त्यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली असून तालुक्यातील संगणकीकृत सातबारासंदर्भात तालुक्यातील एकत्र माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज