अ‍ॅपशहर

शिक्षकांना नकोय मेळघाटात बदली

सलग दहा वर्षे मेळघाटात सेवा दिल्यानंतर शिक्षकांच्या पुन्हा मेळघाटात बदली करण्याचा शासनाचा पवित्रा आहे. याविरोधात ‘मेळघाट रिटर्न शिक्षक’ या संघटनेच्या नेतृत्वातील शिक्षकांनी पुन्हा मेळघाटात बदली नको, अशी भूमिका जाहीर करीत या निर्णयास विरोध दर्शविला आहे.

Maharashtra Times 25 May 2017, 4:00 am
म. टा. वृत्तसेवा, अमरावती
महाराष्ट्र टाइम्स.कॉम teachers dont want melghat transfer
शिक्षकांना नकोय मेळघाटात बदली


सलग दहा वर्षे मेळघाटात सेवा दिल्यानंतर शिक्षकांच्या पुन्हा मेळघाटात बदली करण्याचा शासनाचा पवित्रा आहे. याविरोधात ‘मेळघाट रिटर्न शिक्षक’ या संघटनेच्या नेतृत्वातील शिक्षकांनी पुन्हा मेळघाटात बदली नको, अशी भूमिका जाहीर करीत या निर्णयास विरोध दर्शविला आहे.

मेळघाट रिटर्न शिक्षकांनुसार जिल्ह्यातील पाचशे ते एक हजार शिक्षकांनी यापूर्वीच मेळघाट क्षेत्रात सेवा दिली आहे. परंतु सद्य:स्थितीत त्यांची सेवा सोप्या क्षेत्रात दहा वर्षांपेक्षा जास्त झाल्याने ते पुन्हा अवघड क्षेत्रात बदलीस पात्र ठरत आहेत. आतापर्यंत झालेल्या जिल्ह्यांतर्गत बदल्यांमध्ये ज्या शिक्षकांनी दुर्गम भागात मेळघाट अथवा अवघडमध्ये सेवा दिली आहे. त्यांना त्या त्या वर्षात प्रशासकीय बदल्यांमधून सूट देण्यात आली होती. परंतु ज्या शिक्षकांनी मेळघाट, पेसा क्षेत्रात कधीही सेवा दिली नाही, आतापर्यंत मेळघाटात होणारी बदली टाळण्यासाठी विनंती केली, आपसी बदल्या केल्या अशा सुमारे तीन हजार शिक्षकांची यादी करून त्यांच्या बदल्या प्रथम प्राधान्यक्रमाने मेळघाट व पेसा क्षेत्रात करण्याची मागणी मेळघाट रिटर्न शिक्षकांनी केली आहे. मेळघाटात सेवा दिलेल्या सर्व शिक्षकांना प्रशासकीय बदलीमधून सूट देण्याची मागणीदेखील करण्यात आली.

यावेळी मेळघाट रिटर्नचे सतीश ढगे, वसंत मून, देवेंद्र ढोक, रवींद्र धांडे, प्रकाश देशमुख, वैशाली देशमुख, रवींद्र तायडे, प्रफुल्ल वाठ, प्रमोद चोपडे, संदीप देशमुख, किशोर गणवीर, नंदकिशोर पाचघरे, राघवेंद्र ढोके, दिनेश भलावी, गणेश जोशी, राजेंद्र वारकरी, अजय नेवारे, रितेश मुणोत, राजेश राठोड, वजय नाडगे, संजय काकड, संदीप खडेकार, नंदकुमार तिजारे आदीसह अनेक शिक्षक उपस्थित होते.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज