नागपूर : चॉकलेट आणण्यासाठी दुकानात जात असलेल्या चारवर्षीय चिमुकल्याला भरधाव कारने चिरडून ठार केले. ही घटना भीम चौकातील आहुजानगर भागात घडली. यश राहुल गवई (रा. अमरावती) असे मृतकाचे नाव आहे. यश हा कुटुंबासह त्याचे मामा प्रणय रूपनारायण यांच्याकडे दिवाळीसाठी आला होता. शनिवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास यश व त्याचा आठवर्षीय मामेभाऊ स्पर्श हे दोघे चॉकलेट घेण्यासाठी दुकानात जात होते. दोघे रस्ता पार करताना एमएच-४९-एएच-८७६८ या क्रमांकाच्या भरधाव कारने यशला धडक दिली. यश जखमी झाला. स्पर्श थोडक्यात बचावला. तो धावत घरी गेला. वडील व यशच्या आईला माहिती दिली. नातेवाइकांनी घटनास्थळ गाठले. यशला त्याच कारने खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. याचदरम्यान संधी साधून हॉस्पिटल परिसरातून चालक कारसह पसार झाला. उपचारादरम्यान यशचा मृत्यू झाला. कारच्या क्रमांकाच्या आधारे जरीपटका पोलिस कारचालकाचा शोध घेत आहेत.
भरधाव कारने चिमुकल्याला चिरडले
चॉकलेट आणण्यासाठी दुकानात जात असलेल्या चारवर्षीय चिमुकल्याला भरधाव कारने चिरडून ठार केले ही घटना भीम चौकातील आहुजानगर भागात घडली यश राहुल गवई (रा...
Maharashtra Times 19 Nov 2018, 4:00 am