नागपूर : गेल्या काही दिवसात विदर्भाची वाटचाल उन्हाळ्याकडे होऊ लागली होती. गेल्या आठवड्यात अकोला हे एका दिवसाकरिता राज्यातीलच नाही तर संपूर्ण देशातील हॉट शहर (३९.६) ठरले होते. परंतु आता अचानक ही परिस्थिती बदलली आहे. रविवारी संध्याकाळपासून शहरात आणि विदर्भात किंचितसे ढगाळ वातावरण तयार होऊ लागले. सोमवारी तर शहरात ढगाळ वातावरणच होते. यामुळे गेल्या आठवड्यात ३८ अंश सेल्सिअस पेक्षा अधिक असलेले तापमान सोमवारी ३६.४ वर येऊन पोहोचले. परंतु अकोल्यातील (३८.५) उष्णता कायम होती. विदर्भात सगळ्यात कमी तापमान गोंदिया (३४.४) येथे नोंदविण्यात आले. पुणे आणि नागपूर या दोन्ही वेधशाळांनुसार या आठवड्यात विदर्भात पावसाची शक्यता आहे.
विदर्भात पावसाची शक्यता
गेल्या काही दिवसात विदर्भाची वाटचाल उन्हाळ्याकडे होऊ लागली होती. गेल्या आठवड्यात अकोला हे एका दिवसाकरिता राज्यातीलच नाही तर संपूर्ण देशातील हॉट शहर (३९.६) ठरले होते.
Maharashtra Times 7 Mar 2018, 1:37 pm