नागपूर : विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनासाठी विधानसभा व विधान परिषदेसाठी तालिका सभाध्यक्षांची नियुक्ती करण्यात आली. विधानसभेत विधानसभाध्यक्ष नाना पटोले यांनी संजय रायमूलकर, धर्मरावबाबा आत्राम, अॅड. यशोमती ठाकूर आणि कालिदास कोळंबर यांची नियुक्ती केली. तर, विधान परिषदेत सभापती रामराजे निंबाळकर यांनी गोपीकिसन बाजोरिया, प्रकाश गजभिये, रामदास आंबटकर आणि अनंत गाडगीळ यांच्या नावाची घोषणा केली.
तालिका सभाध्यक्ष झालेत जाहीर
विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनासाठी विधानसभा व विधान परिषदेसाठी तालिका सभाध्यक्षांची नियुक्ती करण्यात आली...
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 18 Dec 2019, 4:00 am