अ‍ॅपशहर

एटीएम लुटायला आले अन् आग लावून बसले; काही मिनिटांतच ठोकली धूम, नागपूरमधील घटना

Nagpur News : एटीएममध्ये चोरी करायला आलेल्या दोन भामट्यांनी काही मिनीटांतच धूम ठोकल्याची घटना नागपूरमध्ये घडली आहे. करायला आले भलतंच अन् घडलं काही निराळंच. काय घडलं नेमकं?

महाराष्ट्र टाइम्स 31 Mar 2023, 1:14 pm
म.टा. प्रतिनिधी, नागपूर : गॅस कटरने एटीएम कापण्याचा प्रयत्न करताना आग लागल्याने चोरटे पसार झाले. ही घटना जरीपटका पोलिस स्टेशन हद्दीतील जिंजर मॉल मार्गावरील कॅनरा बँकेच्या एटीएममध्ये घडली. या घटनेने पोलिसांमध्ये खळबळ उडाली आहे. पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल करून चोरट्यांचा शोध सुरू केला आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम atm2
एटीएम लुटायला आलेल्या दोन भामट्यांनी काही मिनीटांतच काढला पळ; असं काय घडलं?


अशी आहे घटना

गुरुवारी पहाटे २ वाजताच्या सुमारास दोन चोरटे एमटीएममध्ये घुसले. एक बाहेर उभा होता. दोघांनी गॅस कटरने मशिन कापायला सुरुवात केली. अचानक आग लागली. एमटीएममध्ये धूर पसरला. घाबरून चोरट्यांनी गॅस कटर तेथेच सोडले अन् पोबारा केला. गुरुवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. माहिती मिळताच साहाय्यक पोलिस आयुक्त संतोष खांडेकर, जरीपटका पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष बकाल यांच्यासह पोलिसांचा ताफा तेथे पोहोचला.

याप्रकरणी पोलिसांनी चोरीचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला. सीसीटीव्हीच्या आधारे पोलिस चोरट्यांचा शोध घेत आहेत.

महत्वाचे लेख