नागपूर : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी गुरुवारी पोलिस उपायुक्तांच्या अंतर्गत बदल्या केल्या. परिमंडळ चारचे उपायुक्त आयपीएस अधिकारी नीलेश भरणे यांच्याकडे वाहतूक शाखेचा कारभार सोपविण्यात आला. तर वाहतूक शाखेचे उपायुक्त राजतिलक रोशन यांच्याकडे परिमंडळ चारची जबाबदारी देण्यात आली. याशिवाय तहसील पोलिस स्टेशनच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षकपदी अजयकुमार मालविया यांची तर वाडी पोलिस स्टेशनच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षकपदी प्रतापनगर पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक आर. एल. पाठक यांची नियुक्ती करण्यात आली.
डीसीपी भरणेंकडे वाहतूक शाखा
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिस आयुक्त डॉ भूषणकुमार उपाध्याय यांनी गुरुवारी पोलिस उपायुक्तांच्या अंतर्गत बदल्या केल्या...
30 22 Feb 2019, 4:00 am