नागपूर : विविध ठिकाणी झालेल्या अपघातात दोन जण ठार झालेत. पहिली घटना बुधवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास छत्रपती चौकात घडली. चंद्रशेखर रामभाऊ देशमुख रा.उर्विला कॉलनी हे एमएच-३१-एफडी-३६१८ या क्रमांकाच्या मोपेडने जात होते. छत्रपती चौकातील प्रगती बस थांब्याजवळ मागून आलेल्या एमएच-४०-ए-७८१२ या क्रमांकाच्या ट्रकने मोपेडला धडक दिली. चंद्रशेखर खाली पडून ट्रकच्या चाकाखाली आले. नागरिकांनी धाव घेतली. चालक ट्रक सोडून पसार झाला. नागरिकांनी त्यांना मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये दाखल केले. डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. चंद्रशेखर हे एका हिंदी दैनिकात वितरण विभागात कार्यरत होते. त्यांच्या मागे पत्नी रश्मिका व १४ वर्षीय मुलगी अबोली आहे. चंद्रशेखर यांच्या मृत्यूने देशमुख कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. दुसरी घटना कळमन्यातील उमिया औद्योगिक वसाहतीत घडली. ट्रेलरखाली आल्याने सुब्रमणी सुबरय्या रा.तामिळनाडू याचा मृत्यू झाला. दोन्ही प्रकरणी पोलिसांनी प्राणांतिक अपघाताचा गुन्हा दाखल केला आहे.
अपघातात दोघे ठार
विविध ठिकाणी झालेल्या अपघातात दोन जण ठार झालेत पहिली घटना बुधवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास छत्रपती चौकात घडली चंद्रशेखर रामभाऊ देशमुख रा...
Maharashtra Times 19 Apr 2018, 5:00 am