अ‍ॅपशहर

दोन विवाहित महिलांची अनैतिक संबंधातून हत्या; वाठोडा, हुडकेश्वरमधील खळबळजनक घटना

Nagpur Crime News : अनैतिक संबंधातून एकाच दिवशी दोन महिलांच्या हत्याकांडाने नागपूर हादरले. एकीची दगडाने ठेचून तर दुसऱ्या महिलेला ऊशीने तोंड दाबून संपविल्याच्या घटना घडल्या आहेत.

महाराष्ट्र टाइम्स 26 Mar 2023, 12:45 pm
म.टा. प्रतिनिधी, नागपूर : अनैतिक संबंधातून दोन विवाहित महिलांची हत्या करण्यात आली. शनिवारी दुपारी उघडकीस आलेल्या या हत्याकांडांनी उपराजधानी थरारली. दोन्ही प्रकरणांत पोलिसांनी मारेकऱ्यांना अटक केली.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम crime 1280.
दोन विवाहित महिलांची अनैतिक संबंधातून हत्या; वाठोडा, हुडकेश्वरमधील खळबळजनक घटना


असा आहे प्रकार

दीपक इंगळे (वय ४०, रा. साईबाबानगर, दिघोरी) व राजू (वय ४०) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. पहिली घटना वाठोडा पोलिस स्टेशनअंतर्गत घडली. ४०वर्षीय कोयलचे (बदललेले नाव) ‘आपली बस’मध्ये चालक असलेल्या दीपक इंगळेसोबत अनैतिक संबंध होते. दोघेही विवाहित आहेत. चार वर्षांपूर्वी मैत्रिणीच्या माध्यमातून कोयलची दीपकसोबत ओळख झाली. दोघांच्या गाठीभेटी वाढल्या. त्यांच्यात अनैतिक संबंध निर्माण झाले. त्यानंतर दोघेही नेहमी हिंगणा पोलिस स्टेशन हद्दीतील रुई बनवाडी परिसरातील जंगलात जायला लागले. आठ दिवसांपूर्वीही दोघे तेथे गेले होते. काही दिवसांपूर्वी महिलेचे अन्य पुरुषांसोबतही अनैतिक संबंध असल्याचे दीपकला समजले. त्यामुळे तो संतापला. गुरुवारी सायंकाळी तो महिलेला घेऊन रुई बनवाडी येथे गेला. तेथे तिथे कोयलवर बलात्कार केला. त्यानंतर दीपकने दगडाने डोके ठेचून तिचा खून केला व पसार झाला. दरम्यान, महिला घरी न परतल्याने नातेवाइकांनी शोध सुरू केला. वाठोडा पोलिसांत ती बेपत्ता असल्याची तक्रार दिली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुहास चौधरी यांनी प्रकरणाचे गांभीर्य ओळखून तपास सुरू केला. महिलेच्या नातेवाइकांकडे चौकशी केली. चौकशीदरम्यान महिलेचे दीपकसोबत अनैतिक संबंध असल्याचे समोर आले. शनिवारी पोलिसांनी दीपकला चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली. महिलेची हत्या केल्याचे त्याने मान्य केले. त्यानंतर लगेच चौधरी व त्यांचे सहकारी दीपकला घेऊन घटनास्थळी गेले. कोयलचा मृतदेह आढळला. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मेडिकल कॉलेज हॉस्पिटलकडे रवाना केला. खुनाच गुन्हा दाखल करून दीपकला अटक केली.

उशीने तोंड दाबून....

दुसरी घटना हुडकेश्वर पोलिस स्टेशन हद्दीत उघडकीस आली. ३०वर्षीय सेजलचे तीन वर्षांपूर्वी अमरावतीत राहणाऱ्या युवकासोबत लग्न झाले. लग्नानंतर दोघांमध्ये सतत वाद व्हायला लागले. त्यामुळे ती माहेरी परतली. वर्षभरापासून ती आतेभाऊ गजूसोबत ‘लिव्ह इन’मध्ये राहायला लागली. गजूने संपत्ती विकली असून त्यावरच तो उदरनिर्वाह करायचा. गेल्या काही महिन्यांपासून त्याला दारूचे व्यसन लागले. शनिवारी दुपारी दोघांमध्ये वाद झाला. उशीने तोंड दाबून गजूने सेजलची हत्या केली. त्यानंतर एका ऑटोचालकाला बोलाविले. ‘पत्नीची प्रकृती खालावली आहे, तिला हॉस्पिटलमध्ये दाखल करायचे आहे’, असे सांगितले. ऑटोचालकाला संशय आला. त्याने जरीपटका पोलिसांना माहिती दिली.


वरिष्ठ पोलिस निरीक्षक जग्वेंद्रसिंग राजपूत, पोलिस निरीक्षक (गुन्हे) विक्रांत सगणे आदींसह पोलिसांचा ताफा घटनास्थळी पोहोचला. पोलिसांनी चौकशी केली असता सेजलची हत्या केल्याचे गजूने मान्य केले. पोलिसांनी त्याला अटक करून सेजलचा मृतदेह मेडिकल कॉलेज हॉस्पिटलकडे रवाना केला.

महत्वाचे लेख