नागपूर : लग्नाचे आमिष दाखवून २८ वर्षीय तरुणीवर युवकाने अत्याचार केला. ही घटना वाडी भागात उघडकीस आली. वाडी पोलिसांनी गुन्हा दाखल करून युवकाला अटक केली. नंदकिशोर साहेब शर्मा (वय ३२, रा. इंद्रायणीनगर, दत्तवाडी), अटकेतील युवकाचे नाव आहे. दोघेही मॉलमध्ये काम करतात. मे २०१७ मध्ये दोघे एकमेकांच्या संपर्कात आले. नंदकिशोर याने तिला लग्नाचे आमिष दाखविले. तिच्यावर अत्याचार केला. काही दिवसांपूर्वी नंदकिशोर याने लग्नास नकार दिली. तरुणीने वाडी पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनी अत्याचाराचा गुन्हा दाखल नंदकिशोर याला अटक केली.
तरुणीवर अत्याचार
लग्नाचे आमिष दाखवून २८ वर्षीय तरुणीवर युवकाने अत्याचार केला ही घटना वाडी भागात उघडकीस आली वाडी पोलिसांनी गुन्हा दाखल करून युवकाला अटक केली...
Maharashtra Times 14 Sep 2018, 4:00 am