अ‍ॅपशहर

विदर्भाला मान्सूनची आस

दक्षिण विदर्भात मान्सून धडकल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या. पेरण्यांना सुरुवातही झाली. काही भागात २५ टक्क्यांवर पेरण्या झाल्या आहेत. मात्र नंतर मान्सूनचा वेग मंदावल्याने इतर भागात अजूनही पाऊसप्रतीक्षा कायम आहे. हवामान खात्याने येत्या ४८ तासांत मान्सून उर्वरित विदर्भ व्यापणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. यात अडथडा निर्माण झाल्यास पेरण्यांसोबतच जलसंकट तीव्र होणार आहे. दरम्यान, नागपूर विभागात केवळ आठ टक्केच जलसाठा उरला आहे.

Maharashtra Times 19 Jun 2017, 4:00 am
महावितरणचा हलगर्जीपणा; शेतकऱ्याचा मृत्यू
महाराष्ट्र टाइम्स.कॉम vidarbha waiting for mansoon
विदर्भाला मान्सूनची आस


बुलडाणा : पेरणी करीत असताना शेतातून जाणाऱ्या विजेच्या तारांचा स्पर्श होऊन युवा शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी लोणार तालुक्यातील शारा शेतशिवारात घडली. ज्ञानेश्वर उद्धव लहाने (२५), असे त्यांचे नाव आहे. शेतातून खाली आलेल्या विद्युत तारा व्यवस्थित करण्यासंदर्भात शेतकऱ्याने वारंवार निवेदन दिले होते. मात्र अधिकाऱ्यांनी टाळाटाळ केल्याने ज्ञानेश्वर यांचा मृत्यू झाल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. यापूर्वी तांबोळा येथील एका शेतकऱ्याच्या जनावरांचा डीपीच्या धक्क्याने मृत्यू झाला होता.

२६७ गावांना पूरधोका

म. टा. वृत्तसेवा, बुलडाणा

मान्सूनपूर्व पाऊस दमदार झाल्यानंतर आता मान्सूनची प्रतीक्षा आहे. मात्र यंदाच्या पावसात सुमारे २६७ गावे पुरात अडकण्याचा धोका वर्तविण्यात आला आहे. यातील सुमारे २० गावे पूरदृष्ट्या अतिसंवेदनशील आहेत.

७१२ मिमी वार्षिक सरासरी पर्जन्यमान असलेल्या जिल्ह्यात पैनगंगा, खडकपूर्णा, पूर्णा, नळगंगा, विश्वगंगा, ज्ञानगंगा, मस, मन, तोरणा, वान, बोर्डी, व्याघ्रा आदी प्रमुख नद्या आहेत. यातच १३ तालुके, ९६६१ चौरस किलोमीटर भौगोलिक क्षेत्र अन् २५ लाखावर लोकसंख्या आहे. जिल्ह्यातील ८६ गावे अतिप्रवण क्षेत्रात मोडत असून पाच तालुक्यांमध्ये २० गावे पूरदृष्टीने अतिसंवेदनशील आहेत. यामध्ये बेलाड, खरकुंडी, येरळी, परसोडा, उमरखेड, इसरखेड, हिंगणाभोटा, तरोडी, रोटी, दादगाव, इसापूर (नांदुरा), गोळेगाव खुर्द (शेगाव), म्हैसवाडी, काळेगाव, हरसोडा (मलकापूर), उत्रादा, पेठ, सवणा (चिखली), सावरगाव तेली, किनगाव जट्ट (लोणार) गावांचा समावेश आहे.

शेतकरी आज

मागणार दहा हजार

यवतमाळ : नापिकी, कर्जबाजारीपणातून आलेल्या आर्थिक अडचणीमुळे यवतमाळ जिल्ह्यातील २२ गावांतील शेतकऱ्यांनी पेरणीबंदचा निर्णय घेतला आहे. पण, पेरणीसाठी पैशांअभावी ताटकळत बसलेल्या शेतकऱ्यांनी घोषणेप्रमाणे दहा हजार रुपये सरकारने न दिल्यास आणखी काही गावांत पेरणीबंद होण्याचा धोका शेतकरी वारकरी संघटनेचे अध्यक्ष सिकंदर शहा यांनी वर्तविला आहे. याचा निषेध म्हणून आज, सोमवारी बँकेत जावून दहा हजार रुपये मागत आंदोलन करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज