अ‍ॅपशहर

आदिवासी क्षेत्रबंधन उठविण्याचा निर्णय क्रांतिकारक

‘ब्रिटिशांनी आदिवासींवर अन्याय करणारा ‘आदिवासी क्षेत्रबंधन कायदा’ १९३५मध्ये देशात लागू केला होता. या कायद्याने देशातील लाखो आदिवासी आपल्या हक्कापासून अनेक वर्षे वंचित राहिले. पण, तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी १९७८मध्ये घटना दुरुस्ती करून क्षेत्रबंधन उठविले आणि देशातील आदिवासींच्या विकासाचा मार्ग मोकळा झाला’, असे प्रतिपादन राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले. पुसद येथील बाबासाहेब नाईक इंजिनीअरिंग कॉलेजच्या सुधाकरराव नाईक सभागृहात रविवारी माजीमंत्री शिवाजीराव मोघे लिखित ‘आदिवासी क्षेत्रबंधन व इंदिरा गांधी’ या पुस्तकाचे प्रकाशन चव्हाण यांच्या हस्ते आज झाले, त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार मनोहर नाईक होते.

Maharashtra Times 25 Sep 2017, 4:00 am
म.टा. वृत्तसेवा, यवतमाळ
महाराष्ट्र टाइम्स.कॉम yeotmal ex minister moghes book publishing
आदिवासी क्षेत्रबंधन उठविण्याचा निर्णय क्रांतिकारक

‘ब्रिटिशांनी आदिवासींवर अन्याय करणारा ‘आदिवासी क्षेत्रबंधन कायदा’ १९३५मध्ये देशात लागू केला होता. या कायद्याने देशातील लाखो आदिवासी आपल्या हक्कापासून अनेक वर्षे वंचित राहिले. पण, तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी १९७८मध्ये घटना दुरुस्ती करून क्षेत्रबंधन उठविले आणि देशातील आदिवासींच्या विकासाचा मार्ग मोकळा झाला’, असे प्रतिपादन राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले. पुसद येथील बाबासाहेब नाईक इंजिनीअरिंग कॉलेजच्या सुधाकरराव नाईक सभागृहात रविवारी माजीमंत्री शिवाजीराव मोघे लिखित ‘आदिवासी क्षेत्रबंधन व इंदिरा गांधी’ या पुस्तकाचे प्रकाशन चव्हाण यांच्या हस्ते आज झाले, त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार मनोहर नाईक होते.

पृथ्वीराज चव्हाण यांनी, ‘इंदिरा गांधी यांच्या जन्मशताब्दी वर्षात मोघे यांनी लिह‌िलेले पुस्तक त्यांना खऱ्या अर्थाने आदरांजली आहे’, अशा शब्दांत या पुस्तकातील आशयाचा गौरव केला.

प्रास्ताविक भाषणात मोघे यांनी, क्षेत्रबंधन कायद्याची भयावहता उलगडली. इंदिरा गांधी यांनी हा कायदाच रद्द केल्यामुळे आमच्यावरील अन्याय दूर झाला, असे मोघे म्हणाले. माजी मंत्री वसंतराव पुरके यांनी, मोघे यांचे हे पुस्तक एका क्रांतिकारी संघर्षाची कहाणी असल्याचे सांगितले. युवापिढीने यातून प्रेरणा घ्यावी, असे आवाहन केले. विधान परिषदेचे उपाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी देशात लोकशाही अबाधित ठेवण्याचे मोठे काम काँग्रेसने केल्याचे सांगितले. यावेळी शिवाजीराव मोघे यांच्यासोबत क्षेत्रबंधन संघर्षात असलेले मारोतराव वंजारे, गिरधारी पवार, रामकृष्ण चौधरी यांचा सत्कार करण्यात आला. मध्य प्रदेशातील आमदार ओंकार मरकान यांनीही यावेळी विचार व्यक्त केले. आमदार मनोहरराव नाईक यांच्या अध्यक्षीय भाषणाने प्रकाशन सोहळ्याचा समारोप झाला.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज