नागपूर : शिवसेनेचे रामटेकचे खासदार कृपाल तुमाने संसदेत्या परिवहन, पर्यटन व सांस्कृतिक समितीवर तर, राज्यसभा सदस्य डॉ. विकास महात्मे यांची कोळसा व पोलाद समितीवर नियुक्ती करण्यात आली. केंद्र सरकारने विविध संसदीय समित्यांची शनिवारी घोषणा केली. राष्ट्रीय महामार्ग, जहाज बांधणी, नागरी उड्डयण, पर्यटन आणि सांस्कृतिक या पाच मंत्रालयांतर्गत येणाऱ्या समितीवर कृपाल तुमाने यांच्यासह लोकसभेतील २० व राज्यसभेतील १० सदस्य आहेत. यापूर्वी ते अनुसूचित जाती, जमाती कल्याण समितीचे सदस्य होते. खासदार राकेश सिंह यांच्या अध्यक्षतेखालील कोळसा व पोलाद समितीचे डॉ. विकास महात्मे सदस्य आहेत.
तुमाने, महात्मे संसदीय समितीवर
शिवसेनेचे रामटेकचे खासदार कृपाल तुमाने संसदेत्या परिवहन, पर्यटन व सांस्कृतिक समितीवर तर, राज्यसभा सदस्य डॉ...
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 15 Sep 2019, 4:00 am