नागपूर : 'मी बेरोजगार आहे. कुटुंबावर माझे ओझे आहे, त्यामुळे मी आत्महत्या करीत आहे', अशा आशयाची चिठ्ठी लिहून २४वर्षीय युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना रविवारी सायंकाळी कोराडीतील बोखारा येथे उघडकीस आली. रूपल चंद्रकांत आवळे असे मृतकाचे नाव आहे. आयटीआय झालेला रूपल बेरोजगार होता. या बेरोजगारीला कंटाळून रविवारी सायंकाळी त्याने पंख्याला ओढणी बांधून गळफास घेतला. घटनेची माहिती मिळताच हेडकॉन्स्टेबल आदिल शेख ताफ्यासह तेथे पोहोचले. पंचनामा करून मृतदेह मेयो हॉस्पिटलकडे रवाना केला. पोलिसांनी रूपलने मृत्युपूर्वी लिहिलेली चिठ्ठी जप्त केली. रूपलचे वडील चंद्रकांत यांचा बिल्डिंग मटेरियल पुरवठ्याचा व्यवसाय आहे. त्याची आई गृहिणी असून त्याला लहान भाऊ आहे. रूपलच्या आत्महत्येप्रकरणी कोराडी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.
बेरोजगारीला कंटाळून युवकाची आत्महत्या
'मी बेरोजगार आहे कुटुंबावर माझे ओझे आहे, त्यामुळे मी आत्महत्या करीत आहे', अशा आशयाची चिठ्ठी लिहून २४वर्षीय युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केली...
Maharashtra Times 18 Sep 2018, 4:00 am