अ‍ॅपशहर

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण धक्का देण्याच्या तयारीत? काँग्रेस सोडण्याच्या चर्चांना उधाण

Ashok Chavan : अशोक चव्हाण हे बहुमत चाचणीच्या वेळी सभागृहात उशिरा पोहचले होते. त्यामुळे ते मतदान करू शकले नव्हते. त्यांच्यासोबत इतर 4 ते 5 आमदार बहुमत चाचणीपासून दूर राहिले होते.

Authored byअनिश बेंद्रे | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 1 Aug 2022, 3:24 pm

हायलाइट्स:

  • अशोक चव्हाण हे काँग्रेस पक्ष सोडण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चा
  • पक्षाने कारणे दाखवा नोटीस दाखवल्याने चव्हाण नाराज?
  • अशोक चव्हाणांनी सर्व शक्यता फेटाळून लावल्या
बातमी थोडक्यात वाचण्यासाठी अॅप डाउनलोड करा
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Ashok Chavan
अशोक चव्हाण
नांदेड : माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे काँग्रेस पक्ष सोडण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चा सुरु होत्या. या चर्चांना अशोक चव्हाण यांनी पूर्णविराम दिला आहे. मी असा कुठलाही निर्णय घेतला नाही, कोण करत आहे चर्चा, चर्चांना महत्त्व नाही, अशी प्रतिक्रिया देत अशोक चव्हाण यांनी काँग्रेस पक्ष सोडण्याच्या चर्चा उडवून लावल्या.
अशोक चव्हाण हे बहुमत चाचणीच्या वेळी सभागृहात उशिरा पोहचले होते. त्यामुळे ते मतदान करू शकले नव्हते. त्यांच्यासोबत इतर 4 ते 5 आमदार बहुमत चाचणीपासून दूर राहिले होते. दरम्यान आमच्या पाठीशी असणाऱ्या अदृश्य हातांचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात आभार मानले होते. पक्षविरोधी कार्यवाही केल्या प्रकरणी काँग्रेसने अशोक चव्हाण यांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती. तेव्हापासून अशोक चव्हाण पक्षावर नाराज असल्याच्या चर्चा सुरू होत्या.

त्याचबरोबर अशोक चव्हाण पक्ष सोडणार असल्याच्या चर्चा काँग्रेसच्या गोटात सुरू होत्या. पण या चर्चांना काही महत्त्व नाही. कोण करत आहे चर्चा, मी असा कुठलाही निर्णय घेतलेला नाही, अशी प्रतिक्रिया माजी मंत्री अशोक चव्हाण यांनी दिली.

हेही वाचा : शिवसेना संपवून दाखवावी, भाजपचं कर्तृत्व नाही, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

अशोक चव्हाण यांची राजकीय कारकीर्द

अशोक चव्हाण हे ८ डिसेंबर २००८ ते ११ नोव्हेंबर २०१० अशा जवळपास दोन वर्षांच्या काळासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. २००८ साली मुंबईवरील २६/११ च्या हल्ल्यानंतर विलासराव देशमुखांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर ते मुख्यमंत्री झाले. सांस्कृतिक, उद्योग, खाण या खात्यांचेही ते मंत्री होते. चव्हाण महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांचे पुत्र आहेत.

हेही वाचा : आई हवालदिल, लेकी हमसून हमसून रडल्या, उद्धव ठाकरे आता राऊत कुटुंबीयांच्या भेटीला

२००९ सालातील महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणुकीत अशोक चव्हाण आमदार म्हणून निवडून आले. तसेच त्यांना काँग्रेसच्या महाराष्ट्र प्रदेश समितीने पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी दिली. त्यामुळे चव्हाण सलग दुसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले. यापूर्वी काँग्रेस पक्षातर्फे विलासराव देशमुख यांची अशी सलग दोन वेळा निवड झाली होती.

२०१० साली आदर्श हाउसिंग सोसायटी या कारगिलमधील हुतात्म्यांच्या वारसदारांसाठी मुंबईत बांधण्यात आलेल्या इमारतीत त्यांनी आपल्या नातेवाईकांना घरे देऊ केल्याबद्दल गदारोळ होऊन त्यांना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणे भाग पडले.

हेही वाचा : दीपक केसरकरांच्या घरासमोरुन रोड शो नाहीच, आदित्य ठाकरेंचं स्वप्न अधुरं
लेखकाबद्दल
अनिश बेंद्रे
महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये सिनिअर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत | क्राईम विषयाचा 'मास्टरमाईंड' | सामाजिक, राजकीय आणि मनोरंजनविषयक बातम्यांमध्येही हातखंडा | एबीपी माझा, टीव्ही९ मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात १० वर्षांचा अनुभव... आणखी वाचा

महत्वाचे लेख