नांदेड : जगभरात करोना विषाणूने थैमान घातले आहे. या विषाणूच्या प्रादुर्भावामुळे अनेक कुटुंबंही उद्धवस्त झाली. आनंदाने सुरू असलेल्या संसारामध्ये होत्याचं नव्हतं झालं. असाच काहीसा दु:खाचा डोंगर नांदेड शहरातील पार्डीकर कुटुंबीयांवर कोसळला आहे. अवघ्या पंधरा दिवसात घरातील एका डॉक्टरसह चार प्रमुख व्यक्तींचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. ४४ वर्षीय डॉक्टर अनिल पार्डीकर यांच्यासह ७८ वर्षाचे त्यांचे वडील काशीनाथ पार्डीकर, ७० वर्षीय आई कुसुमताई पार्डीकर आणि 50 वर्षीय मोठा भाऊ अतुल पार्डीकर यांचा करोनामुळे एका पाठोपाठ मृत्यू झाला आहे.
४ एप्रिल ते २० एप्रिल या कालावधीत कुटुंबातील या चारही जणांनी करोनामुळे आपली जीव गमावला.
डॉ. अनिल पार्डीकर यांचे श्रीनगर येथे आपले क्लिनिक चालवत होते. रुग्णांना सेवा देत असतानाच त्यांना करोना आजाराने ग्रासले. डॉ. अनिल पार्डीकर हे नाइक नगर येथे आई, वडील, पत्नी आणि दोन मुले तसेच मोठे भाऊ शिक्षक असलेले अतुल पार्डीकर, त्यांच्या पत्नीसह दोन लहान मुली असा मोठा परिवार आनंदाने राहत होता. पण या हसत्या-खेळत्या कुटुंबावर करोनाने झडप घातली.
घरातील कुटुंब प्रमुखांचे निधन झाल्याने मुलावरील वडिलांचं छत्र हरवले आहे, तर त्यांच्या पत्नीने आपला जीवनसाथी गमावला आहे. आता जीवनात अंधार दिसत असल्याची भावना डॉ. अनिल पार्डीकर यांच्या पत्नीने व्यक्त केली आहे.