अ‍ॅपशहर

नांदेडमध्ये दिवसभरात २६ मृत्यू

जिल्ह्यामध्ये करोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत असून, शनिवारी दिवसभरात २६ रुग्णांचा मृत्यू झाला. तर, १२०७ नव्या रुग्णांची नोंद झाली.

Authored byम. टा. प्रतिनिधी | महाराष्ट्र टाइम्स 4 Apr 2021, 1:02 pm
नांदेड : जिल्ह्यामध्ये करोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत असून, शनिवारी दिवसभरात २६ रुग्णांचा मृत्यू झाला. तर, १२०७ नव्या रुग्णांची नोंद झाली. जिल्ह्यामध्ये रेमडेसिविरच्या इंजेक्शनचा तुटवडा असून, १२०० रुपयांचे इंजेक्शन पाच हजार रुपयांपर्यंत मिळत आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम नांदेडमध्ये दिवसभरात २६ मृत्यू


जिल्ह्यामध्ये रुग्णसंख्या वेगाने वाढत असून, सक्रिय रुग्णांची संख्या १० हजार ७२५वर पोहोचली आहे. शहरातील सर्व सरकारी व खासगी रुग्णालये पूर्ण भरली आहेत. त्यामुळे, रुग्णांना बेड मिळवण्यासाठी बराच आटापिटा करावा लागत आहे. यातच, रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा आहे. सरकारने या इंजेक्शनची किंमत १२०० रुपये निश्चित केलेली असताना, पाच हजार रुपयांपर्यंत हे इंजेक्शन विकण्यात येत आहे. अनेक ठिकाणी जादा दर देऊनही इंजेक्शन उपलब्ध होत नसल्याच्या तक्रारी आहेत.

दरम्यान, करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शहरामध्ये लागू करण्यात आलेल्या संचारबंदीची मुदत रविवारी सायंकाळी संपत आहे. त्यानंतर, राज्य सरकार काय निर्णय घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. जिल्ह्यात २४ मार्चपासून संचारबंदी लागू करण्यात आली होती.

खासगी प्रयोगशाळेविरोधात गुन्हा

करोनाची चाचणी करण्यासाठी अनेक नागरिक खासगी प्रयोगशाळांचा पर्याय निवडत असताना, या प्रयोगशाळांकडून अव्वाच्या सव्वा दर आकारण्यात येत आहेत. अनेक प्रयोगशाळांमध्ये प्रचंड दर आकारण्यात येत असल्याच्या तक्रारी आल्या होत्या. त्यामुळे, जिल्हाधिकाऱ्यांनी शुक्रवारी एका प्रयोगशाळेची पाहणी करत, त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज