अ‍ॅपशहर

नांदेड जिल्ह्यात दिवसभरात १५ रुग्ण, दोन मृत्यू

जिल्ह्यामध्ये शनिवारी करोनाच्या १५ नव्या रुग्णांची नोंद झाली, तर दोन जणांचा मृत्यू झाला. जिल्ह्यामध्ये गेल्या महिन्यात थैमान घालत असलेल्या करोनाचा प्रादुर्भाव आता काहीसा कमी होत असल्याचे दिसत आहे.

Authored byम. टा. प्रतिनिधी | महाराष्ट्र टाइम्स 13 Jun 2021, 1:39 pm
नांदेड : जिल्ह्यामध्ये शनिवारी करोनाच्या १५ नव्या रुग्णांची नोंद झाली, तर दोन जणांचा मृत्यू झाला. जिल्ह्यामध्ये गेल्या महिन्यात थैमान घालत असलेल्या करोनाचा प्रादुर्भाव आता काहीसा कमी होत असल्याचे दिसत आहे. आठवडाभरापासून जिल्ह्यातील परिस्थिती दिलासा देणारी ठरत आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम नांदेड जिल्ह्यात दिवसभरात १५ रुग्ण, दोन मृत्यू


अर्धापूर येथील इंदिरा नगरमध्ये राहणाऱ्या ६५ वर्षीय महिलेचा, तर पाटबंधारे नगर परिसरातील एका ५४ वर्षीय इसमाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. दिवसभरात दोन हजार ७७४ जणांची चाचणी करण्यात आली. त्यापैकी १५ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. सध्या जिल्ह्यात ५२९ जणांवर उपचार सुरू असून त्यापैकी सहा जणांची प्रकृती चिंताजनक आहे. आतापर्यंत जिल्ह्यात एक हजार ८९७ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला. उपचारादरम्यान रुग्ण बरे होण्याची टक्केवारी ९६.७३ आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज