अ‍ॅपशहर

Weather News : राज्यात अवकाळी पावसाचा हाहाकार, ऐन उन्हाळ्यात नदीला पूर, अतिवृष्टीमुळे ३५ घरं उद्ध्वस्त

Nandurbar Weather Forecast : राज्यात उन्हाचा तडाखा वाढत असताना एका जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. नंदुरबारमध्ये तुफान वादळी वाऱ्यासह पाऊस झाला आहे. इथे वाऱ्यामुळे ३५ हून अधिक आदिवासी कुटुंबांचे घरांचे नुकसान झालं आहे.

Edited byरेणुका धायबर | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 20 May 2023, 9:10 pm
नंदुरबार : राज्यात एकीकडे उन्हाचा तडाखा वाढत आहे तर दुसरीकडे नंदुरबार जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाने कहर केला आहे. नंदुरबार जिल्ह्याच्या तळोदा तालुक्यातील रापापुर इथे तुफान वादळीवाऱ्यासह जोरदार पाऊस झाला असून तुफान वाऱ्यामुळे ३५ हून अधिक आदिवासी कुटुंबांचे घरांचे नुकसान झालं आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम weather forecast maharashtra


घरावर असलेले पत्रे, छतदेखील उडाले आहेत. त्यातच घरात साठवून ठेवलेले धान्य इतर संसार उपयोगी वस्तू हे पूर्ण पाण्यात भिजली असून याठिकाणी मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. नंदुरबार जिल्ह्याच्या तळोदा तालुक्यातील रापापुर परिसरात आज झालेल्या अतिवृष्टीमुळे नदी-नाल्यांना पूर आला. त्यातच वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे अनेक झाडेही कोलमडून पडली आहेत.

Monsoon update: मान्सूनची Good News, उशिराने नाही तर 'या' तारखेला येणार, वाचा IMD चा अंदाज
वादळात मोठ्या प्रमाणात जोरदार पाऊस झाल्याने शेतात पाणी शिरलं आहे. यातच घराचे नुकसान झाले असून आदिवासी कुटुंब हे आता उघड्यावर आले आहेत. उन्हाळ्याच्या दिवसात अतिवृष्टी झाल्याने आदिवासी हताश झाले आहेत. वादळी वाऱ्यांमुळे घरांचे आणि विजेचा खांबांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

विजेचे खांब कोसळल्याने परिसरात विद्युत पुरवठा खंडित झाला आहे. यातच वादळात घराचे नुकसान झालेल्यांना लवकरात लवकर पंचनामे करून शासनाने मदत करावी अशी मागणी आता आदिवासी कुटुंब करू लागले आहेत.
लेखकाबद्दल
रेणुका धायबर
रेणुका धायबर, महाराष्ट्र टाइम्समध्ये Senior Digital Content Producer आहेत. डिजिटल पत्रकारितेचा आठ वर्षांचा अनुभव आहे. २०१४ पासून पत्रकारीतेत आहेत. झी २४ तास , न्यूज १८ लोकमत, टीव्ही ९ अशा वेबसाइटसाठी त्यांनी काम केले आहे. महाराष्ट्र, राजकारण, गुन्हेगारी, देश, विदेश, स्पेशल बातम्या यासोबत व्यवसाय विषयात त्यांची आवड आहे.... आणखी वाचा

महत्वाचे लेख