अ‍ॅपशहर

६० गावांमध्ये उन्हाळ्यात भासणार पाणीटंचाई

भूवैज्ञानिक, भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा यांच्या अहवालानुसार नाशिक जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी यांनी बागलाण व मालेगाव तालुक्यातील तब्बल ६० गावे टंचाईग्रस्त म्हणून घोषित केली आहेत.

Maharashtra Times 18 Dec 2017, 4:00 am
अहवालानुसार उपाययोजना करण्याचे आदेश
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 60 villeges will face water shortage
६० गावांमध्ये उन्हाळ्यात भासणार पाणीटंचाई


म. टा. वृत्तसेवा, सटाणा

भूवैज्ञानिक, भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा यांच्या अहवालानुसार नाशिक जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी यांनी बागलाण व मालेगाव तालुक्यातील तब्बल ६० गावे टंचाईग्रस्त म्हणून घोषित केली आहेत. या गावांना प्राधान्याने पाण्याचे स्त्रोत संरक्षित करण्यासाठी उपाययोजना राबविण्याचे आदेशदेखील जारी केले आहेत.

शासनाच्या टंचाई कृती आराखड्यानुसार ऑक्टोबर ते डिसेंबर, जानेवारी ते मार्च व एप्रिल ते जून अशा तीन टप्प्यात टंचाई निवारण करण्यासाठी उपाययोजना करण्यात येतात. जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी यांनी पाणीटंचाई निवारणासाठी भूवैज्ञानिक व भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेला सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले होते. यानुसार नुकत्याच झालेल्या टंचाई आढावा बैठकीत सादर केलेल्या सर्वेक्षण अहवालात बागलाण व मालेगाव तालुक्यातील ऑक्टोबर ते मार्च अखेरपर्यंत भूगर्भातील पाण्याची पातळी टिकून राहणार आहे. त्यामुळे या सहा महिने पिण्याच्या पाण्याची टंचाई भासणार नाही. त्यानंतर मात्र पाणीपातळीत घट होऊन एप्रिल ते जून या तीन महिन्यांत साठ गावांना पाण्याची तीव्र टंचाई जाणवणार आहे, असे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

मालेगाव तालुक्यातील गावे

कजवाडे, पोहाणे, विराणे, भायगाव, अजंग, कोठरे ब्रुद्रकु, सातमाने, वडनेर, पांढरूण या गावांचा समावेश आहे.

बागलाण तालुक्यातील गावे

घोषित केलेल्या साठ गावांमध्ये बागलाणमधील चिराई, महड, सारदे, वायगाव, रातीर, देवळाणे, सुराणे, राजपूरपांडे, श्रीपूरवडे, टिंगरी, उत्राणे, वडे खुर्द, वाघळे, ब्राह्मणपाडे, जायखेडा, जाखोड, करंजाड, निताणे, लाडूद, सोमपूर, आसखेडा, द्याने, फोफीर, खिरमाणी, कोटबेल, नामपूर, अजमीर सौंदाणे, कऱ्हे, जुनी शेमळी, लखमापूर, यशवंतनगर, अंतापूर, दगडपाटा, जामोटी, मोराणे दिगर, मुल्हेर, रावेर, ताहाराबाद, वडेदिगर, अलियाबाद, बाभूळणे, बोरदैवत, कांद्याचा मळा, खरड, परशुराम नगर, वाघंबे या गावांचा समावेश आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज