अ‍ॅपशहर

पुराच्या पाण्यात तरुणाची स्टंटबाजी, नको ते धाडसं पडलं महागात; थरारक VIDEO व्हायरल

Nashik Rain News : गिरणा नदीला आलेल्या पुरात एका तरुणाने जीवघेणं स्टंट केल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पाण्यात स्टंट करण्यासाठी उडी मारणारा तरुण यानंतर वाहून गेला तो अद्याप त्याचा शोध लागलेला नाही. मालेगाव इथे ही खळबळजनक घटना घडली असून पोलीस तपास सुरू असल्याची माहिती आहे.

Edited byरेणुका धायबर | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 14 Jul 2022, 10:39 am
नाशिक : मुसळधार पाऊस सुरू असल्यामुळे सध्या सर्वत्र नदी-नाले दुथडी भरून वाहत आहेत. अनेक नद्यांनी तर धोक्याची पातळी ओलांडली असून गावांना पुराचा फटका बसल्याचं पाहायला मिळत आहे. अशात नाशिकमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका तरुणाचा स्टंट व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या तरुणाने केलेलं धाडस त्याला महागात पडलं आहे. कारण अद्याप तरुणाचा शोध लागला नसल्याची माहिती आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम stunts videos


जीव धोक्यात घालून पुराच्या पाण्यात स्टंटबाजी सुरूच असून अशीच एक खळबळजनक घटना मालेगावात समोर आली असून गिरणा नदीत पुराच्या पाण्यात पुलावरूनप स्टंट बाजी करताना तरुण वाहून गेला. नईम अमीन असं या तरुणाचं नाव असून त्याचा शोध घेतला जात आहे. मात्र, त्याचा अद्याप कुठेही शोध लागला नाही. रात्रीपर्यंत शोध सुरू होता पण अंधार झाल्यामुळे शोध मोहीम थांबवण्यात आली.

Junnar Rain Video : बघता-बघता ओढ्यात वाहून केला व्यक्ती, घटनेचे थरारक दृष्य कॅमेऱ्यात कैद

खवळलेल्या समुद्रात महिलेच्या डोळ्यांदेखत पतीसह दोन मुलं वाहून गेली; पाहा धडकी भरवणारे दृश्य

या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून पोलीस तपास सुरू असल्याची माहिती आहे. दरम्यान, पाण्याच्या ठिकाणांपासून लांब रहा, अशा वारंवार सूचना दिल्या जात असताना आताची तरुणाई अशा प्रकारे धाडस दाखवत आहे. पण यामुळे जीवाला धोका आहे, ही बाब लक्षात घेणं महत्त्वाचं आहे.
लेखकाबद्दल
रेणुका धायबर
रेणुका धायबर, महाराष्ट्र टाइम्समध्ये Senior Digital Content Producer आहेत. डिजिटल पत्रकारितेचा आठ वर्षांचा अनुभव आहे. २०१४ पासून पत्रकारीतेत आहेत. झी २४ तास , न्यूज १८ लोकमत, टीव्ही ९ अशा वेबसाइटसाठी त्यांनी काम केले आहे. महाराष्ट्र, राजकारण, गुन्हेगारी, देश, विदेश, स्पेशल बातम्या यासोबत व्यवसाय विषयात त्यांची आवड आहे.... आणखी वाचा

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज