नाशिक : सोमवारी घरोघरी बाप्पाचे आगमन होणार असून, रविवारी गणेशोत्सवाच्या खरेदीची लगबग असतानाच सायंकाळी पाच वाजेपासून शहरातील विविध भागात पावसाचे आगमन झाले. त्यामुळे गणेशमूर्ती, सजावट साहित्य, पूजाविधी साहित्य खरेदी थोड्या फार प्रमाणात मंदावल्याचे दिसून आले. गणेशोत्सवाच्या पूर्वसंध्येला काही भागात पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. दुपारी तीन वाजेपासून शहरात ढगाळ वातावरण असल्याने गारवा वाढला होता. पूर्वसंध्येला हलक्या सरींनी हजेरी लावल्याने गणेशोत्सवात अकरा दिवस पाऊस असेल का, चिंता भाविकांना पडली आहे.
पावसाचे आगमन
सोमवारी घरोघरी बाप्पाचे आगमन होणार असून, रविवारी गणेशोत्सवाच्या खरेदीची लगबग असतानाच सायंकाळी पाच वाजेपासून शहरातील विविध भागात पावसाचे आगमन झाले...
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 2 Sep 2019, 4:00 am