नाशिक : शहरात वावर ठेवणाऱ्या तडीपार रवी अण्णा उगले (२६ रा. गोविंदा अपार्ट. कुमावतनगर, मखमलाबादरोड)यास पोलिसांनी अटक केली. ही कारवाई शहर गुन्हे शाखेच्या युनिट एकच्या पथकाने केली. मंगळवारी (दि.२५) रात्री तो कुमावतनगर भागात येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा लावून अटक करण्यात आली. उगले यास एक वर्षासाठी शहर आणि जिह्यातून हद्दपार केलेले आहे. मात्र, कोणतीही परवानगी न घेता तो शहरात दाखल झाला होता. अधिक तपास पंचवटी पोलिस करीत आहेत.
तडीपार अटकेत
शहरात वावर ठेवणाऱ्या तडीपार रवी अण्णा उगले (२६ रा गोविंदा अपार्ट कुमावतनगर, मखमलाबादरोड)यास पोलिसांनी अटक केली...
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 25 Dec 2019, 4:00 am