देवळाली कॅम्प : येथील पोलिस पथक गुरुवारी मध्यरात्री गस्त घालत असताना बार्न्स स्कूल रोडवर त्यांना बिबट्याचे दर्शन झाले. पोलिस हवालदार संजय बोराडे, गृहरक्षक दलाचे मुठाळ हे दोघे चारचाकी वाहनाने गस्त घालत असताना अचानक रस्त्याच्या डाव्या बाजूला बिबट्या दिसून आला. गाडीच्या आवाजाने त्याने धूम ठोकली. या परिसरात मागील महिन्याच्या १९ तारखेला शिवानंदा फार्म हाऊसच्या प्रवेशद्वारावरील गेटवर बिबट्या बसलेला दिसून आला होता. त्याआधी थेट लष्कराच्या फायरिंग रेंज परिसरात बिबट्या एका तोफेवर बसलेल्या स्थितीत आढळून आला होता. त्यामुळे मल्हारबाबानगर व बार्न्स स्कूल परिससरातील नागरिकांमध्ये पुन्हा एकदा भीतीचे वातावरण पसरले आहे.
बार्न्स स्कूलरोडवर बिबट्याचे दर्शन
येथील पोलिस पथक गुरुवारी मध्यरात्री गस्त घालत असताना बार्न्स स्कूल रोडवर त्यांना बिबट्याचे दर्शन झाले...
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 7 Dec 2019, 4:00 am