अ‍ॅपशहर

नगरसेविकाच्या पतीने शिवसैनिकाला चोपले

नाशिकरोड येथील मित्रमेळा सामाजिक संस्थेचा संस्थापक राजेंद्र उर्फ कन्नू ताजणे याने दारुच्या नशेत बुधवारी (दि. २२) रात्री भर रस्त्यात शिवसेनेच्या एका कार्यकर्त्यास गंभीर मारहाण केली.

Maharashtra Times 24 Mar 2017, 3:35 am
सिन्नर फाटा : नाशिकरोड येथील मित्रमेळा सामाजिक संस्थेचा संस्थापक राजेंद्र उर्फ कन्नू ताजणे याने दारुच्या नशेत बुधवारी (दि. २२) रात्री भर रस्त्यात शिवसेनेच्या एका कार्यकर्त्यास गंभीर मारहाण केली. त्याच्याविरोधात उपनगर पोलिसात गुन्हा दाखल झाला. कन्नू ताजणे प्रभाग २० मधील भाजप नगरसेविका डॉ. सीमा ताजणे यांचा पती आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम bjp corporator husband bitten shivsena worker
नगरसेविकाच्या पतीने शिवसैनिकाला चोपले


उपनगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री साडेआठ वाजेदरम्यान सानेगुरुजीनगर येथे कन्नू ताजणे आपल्या सहकाऱ्यांसह उभा होता. त्याच दरम्यान सानेगुरुजीनगरमध्ये वास्तव्यास असलेला प्रशांत बळवंत तारे आपल्या घराकडे जात होता. कन्नू ताजणे याने त्यास थांबविले आणि आपल्याला जबर मारहाण केली, अशी फिर्याद प्रशांत तारे याने उपनगर पोलिसांत दिली आहे. या मारहाणीप्रसंगी कन्नू ताजणे दारुच्या नशेत असल्याचे फिर्यादी प्रशांत तारे यांचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे प्रशांत तारे व कन्नु ताजणे एकमेकांचे जुने मित्र आहेत. असे असतांना कन्नू ताजणे याने प्रशांतला मारहाण केल्याने शहरात चर्चेचा विषय ठरला आहे. कन्नू ताजणे व प्रशांत तारे दोघेही मित्र आहेत. कन्नू ताजणे काही महिन्यांपूर्वीच भाजपवासी झाले. तर प्रशांत याने राष्ट्रवादी काँग्रेसमधून‌ शिवसेनेमध्ये प्रवेश केला होता.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज