सातपूर : पश्चिम मतदारसंघातील अशोकनगरच्या विश्वासनगर भागात मतदान चिठ्ठीचे साहित्य देत पैसेवाटप होत असल्याच्या तक्रारीनंतर भरारी पथकाने दोन जणांना ताब्यात घेतले. पैसेवाटपाचा हा प्रकार सीटू कामगारांच्या लक्षात आल्यानंतर कार्यकर्त्यांनी या दोघांना पकडले होते. भानुदास हादगे यांच्या फिर्यादीवरून संशयित जितेंद्रसिंग पवार व अनिल शेवाळे यांच्यावर सातपूर पोलिस स्टेशनमध्ये अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयितांकडून २५ हजारांची रक्कम ताब्यात घेण्यात आली आहे.
भरारी पथकाकडून दोघे ताब्यात
पश्चिम मतदारसंघातील अशोकनगरच्या विश्वासनगर भागात मतदान चिठ्ठीचे साहित्य देत पैसेवाटप होत असल्याच्या तक्रारीनंतर भरारी पथकाने दोन जणांना ताब्यात ...
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 20 Oct 2019, 4:00 am