नाशिक : सेंट लॉरेन्स हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांचा शाळेचा १०० वा दिन आगळ्या वेगळ्या पध्दतीने साजरा करण्यात आला. पहिली ते तिसरीच्या विद्यार्थ्यांनी नवीन १०० शब्द, १०० विशेषणे व तिसरीच्या विद्यार्थ्यांनी वाचन केलेल्या १०० पुस्तकातील माहिती व गोष्टींचे आत्मविश्वासाने सर्वांसमोर सादरीकरण केले. शिक्षकांनीही विद्यार्थ्यांचे १०० विशेष गुण ओळखून विद्यार्थ्यांना त्यांच्या विशेष गुणांचे आकर्षक कार्ड भेट दिले. विद्यार्थ्यांनी टाकाऊतून टिकाऊ वस्तू बनविल्या. आजी-आजोबांची वेशभूषा परिधान करून १०० वर्षांनी आम्ही वयाने, ज्ञानाने, अनुभवाने, प्रगतीने मोठे होऊन कसे दिसणार हे दर्शविले.
शंभरावा दिन साजरा
सेंट लॉरेन्स हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांचा शाळेचा १०० वा दिन आगळ्या वेगळ्या पध्दतीने साजरा करण्यात आला...
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 1 Jan 2020, 4:00 am