अ‍ॅपशहर

चांदवडमध्ये उत्पादकांचा असंतोष

कांद्याच्या भावात दररोज घसरण होत असल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या असंतोषात भर पडली असून, चांदवड येथे संतप्त कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी कांद्याला हमी भाव मिळावा, अशा घोषणा देत मुंबई-आग्रा महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले.

Maharashtra Times 22 Dec 2016, 4:05 am
म. टा. वृत्तसेवा, मनमाड
महाराष्ट्र टाइम्स.कॉम chandwad rasta roko
चांदवडमध्ये उत्पादकांचा असंतोष


कांद्याच्या भावात दररोज घसरण होत असल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या असंतोषात भर पडली असून, चांदवड येथे संतप्त कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी कांद्याला हमी भाव मिळावा, अशा घोषणा देत मुंबई-आग्रा महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले. त्याआधी चांदवड बाजार समितीत कांद्याचे लिलाव बंद पाडून शेतकऱ्यांनी असंतोषाला वाट करून दिली. तब्बल अर्धा तास महामार्ग रोखल्यानंतर आंदोलकांनी प्रशासनाला

निवेदन देऊन मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा दिला. चांदवड बाजार समितीत बुधवारी सकाळी साडे दहा वाजता कांद्याचे लिलाव सुरू झाले. यावेळी लाल कांद्याला केवळ ३०० ते ६०० रुपये भाव असल्याचे

निदर्शनास आले. त्यामुळे शेतकरी संतप्त झाले. चार दिवसांत २०० ते २५० रुपयांनी कांद्याचे भाव घसरल्याने शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेत लिलाव बंद पाडले. त्यानंतर महामार्गावर आंदोलन केले. शेतकऱ्यांनी उत्स्फूर्तपणे हे आंदोलन केले. यावेळी माजी आमदार शिरीष कोतवाल, डॉ. आत्माराम कुंभार्डे, नितीन आहेर आदी उपस्थित होते.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज