अ‍ॅपशहर

‘दारू दुकाने बंद करा अन्यथा उपोषण’

दत्तचौक व महाकाली चौकात असलेल्या देशी दारूच्या दुकानांमुळे परिसरातील नागरिकांना खूप त्रास होत असून, येथील नागरिकांनी संतापाच्या भरात दोन दिवसांपूर्वी दुकाने बंद करण्याचा निर्णय घेतला होता.

Maharashtra Times 18 Apr 2017, 4:00 am
म. टा. वृत्तसेवा, सिडको
महाराष्ट्र टाइम्स.कॉम close alcohol shops or fast at cidco area
‘दारू दुकाने बंद करा अन्यथा उपोषण’


दत्तचौक व महाकाली चौकात असलेल्या देशी दारूच्या दुकानांमुळे परिसरातील नागरिकांना खूप त्रास होत असून, येथील नागरिकांनी संतापाच्या भरात दोन दिवसांपूर्वी दुकाने बंद करण्याचा निर्णय घेतला होता. यासंदर्भातच सोमवारी (दि. १७) जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन संबंधित दुकानांमुळे होणाऱ्या त्रासाची चर्चा करून निवेदन दिले. हे दुकाने बंद न केल्यास बेमूदत उपोषण करण्यात येईल, असा इशारा नगरसेवक मुकेश शहाणे यांनी दिला आहे.

सिडकोतील दत्त चौक व महाकाल चौक येथे असलेल्या देशी दारू दुकानांमुळे या परिसरातील नागरिकांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे. या दुकानांच्या जवळ महाकाली व महालक्ष्मीचे मंदिर असल्याने याठिकाणी महिलांची वर्दळ जास्त असते. मात्र या दोन्ही दुकानांमधून मद्यपान करून आलेले मद्यपी या महिलांची छेडछाड करीत असतात. त्याचबरोबर या परिसरातील महिलांची किंवा मुलींची छेडछाड करून शिवीगाळ केल्याचे प्रकार होत असतात. नागरिकांनी दोन्ही दुकाने तातडीने बंद करून येथील नागरिकांचा त्रास बंद करावा, अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. यावेळी नगरसेवक मुकेश शहाणे यांच्यासह शशिकांत जाधवही उपस्थित होते. जिल्हाधिकाऱ्यांना या दोन्ही दुकानांबाबत निवेदन देण्यात आले आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज