देवळाली कॅम्प : नगरसेविका आशा गोडसे व शिवनेरी स्पोर्ट्स क्लबचे चंद्रकांत गोडसे या दाम्पत्याने आठवडे बाजारात ५०० कापडी पिशव्यांचे मोफत वाटप केले. राज्यात सुरू झालेल्या कायद्याची अंमलबजावणी देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीत व्हावी, या उद्देशाने येथे रविवारी भरणाऱ्या आठवडे बाजाराच्या निमित्ताने ५०० कापडी पिशव्या स्वखर्चातून विकत घेत बाजारात येणाऱ्या नागरिकांसह लष्करी अधिकारी व त्यांच्या कुटुंबियांना वाटप केले. आणलेल्या पिशव्या काही क्षणात हातोहात वाटप करण्यात आल्या. याप्रसंगी सुनील गुप्ता, मंगेश सुजगुरे, ज्ञानेश्वर शेळके, अशोक गोडसे, विक्रम गोडसे, सागर गायकवाड आदी उपस्थित होते.
आठवडे बाजारात कापडी पिशव्यावाटप
नगरसेविका आशा गोडसे व शिवनेरी स्पोर्ट्स क्लबचे चंद्रकांत गोडसे या दाम्पत्याने आठवडे बाजारात ५०० कापडी पिशव्यांचे मोफत वाटप केले...
Maharashtra Times 2 Apr 2018, 5:00 am