अ‍ॅपशहर

नाशिक: कपाशीची बोंडे सडली, कांदा रोपांवर बुरशी

यावर्षी अगदी दीर्घकाळ चाललेल्या परतीच्या पावसाचा तडाखा सुरूच असून नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्‍यात सोमवारी सायंकाळी ७ वाजल्यानंतर झालेल्या अवकाळी पावसाने तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतशिवारातील काढणीला आलेल्या मका, कापूस, सोयाबीन ह्या खरीप हंगामातील पिकांसह लागवड केलेल्या लेट खरीप लाल पोळ कांद्यास मोठा फटका दिला आहे. याबरोबरच पुढील रब्बी हंगामाच्या दृष्टीने तालुक्यातील शेतकऱ्यांनी मोठा खर्च करून टाकलेली उन्हाळ कांद्याची रोपे देखील अतिपावसाने सडण्यास सुरुवात झाली आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 29 Oct 2019, 2:18 pm
येवला: यावर्षी अगदी दीर्घकाळ चाललेल्या परतीच्या पावसाचा तडाखा सुरूच असून नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्‍यात सोमवारी सायंकाळी ७ वाजल्यानंतर झालेल्या अवकाळी पावसाने तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतशिवारातील काढणीला आलेल्या मका, कापूस, सोयाबीन ह्या खरीप हंगामातील पिकांसह लागवड केलेल्या लेट खरीप लाल पोळ कांद्यास मोठा फटका दिला आहे. याबरोबरच पुढील रब्बी हंगामाच्या दृष्टीने तालुक्यातील शेतकऱ्यांनी मोठा खर्च करून टाकलेली उन्हाळ कांद्याची रोपे देखील अतिपावसाने सडण्यास सुरुवात झाली आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम cotton-pod-rotten


ढगाळ वातावरण आणि अतिपाऊस यामुळे उन्हाळ कांदा रोपांवर बुरशीचा प्रादुर्भाव देखील होऊ लागला आहे. तालुक्यातील अनेक ठिकाणी सध्या खरीप हंगामातील कपाशी काढण्याच्या अवस्थेत असून गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला पाऊस, सातत्याचे ढगाळ वातावरण आणि न मिळणारा सूर्यप्रकाश यातून कपाशी पिकास देखील मोठा झटका बसला आहे. पाऊस सुरूच राहिल्याने कपाशीच्या बोंडात पाणी घुसून कापूस सडू लागला आहे. कपाशीतील सरकीस देखील मोड फुटल्याचे दिसत आहे. मकाच्या बीटीत देखील पाणी घुसून मोड फुटल्याचे चित्र समोर आलं आहे.

'यंदा प्रारंभी १२ पायली उन्हाळ कांद्याचे रोप शेतात टाकले होते. ते महिनाभरापूर्वी झालेली पावसात मोठया प्रमाणात सडून गेले होते. त्यानंतर बाहेरून कांदा उळे (बियाणे) आणून काही दिवसांपूर्वी पुन्हा दुसऱ्या टप्प्यात उन्हाळची रोपे टाकली. मात्र परतीचा पाऊस दीर्घकाळ सुरूच राहिल्याने ही रोपे देखील सडण्याचा मार्गावर आहेत. त्यातून पुढील रब्बी हंगामात उन्हाळ कांद्याची लागवड करण्यास उशीर होणार आहे. रोपे अधिक खराब झाल्याने उन्हाळ कांद्याची एकरी लागवड देखील कमी होणार आहे- विजय भोरकडे, शेतकरी, पिंपळगाव जलाल

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज