अ‍ॅपशहर

धरणातील विसर्ग घटला

धरणातील विसर्ग घटलापावसाने विश्रांती घेतल्याने गंगापूर आणि दारणातून विसर्ग कमी करण्यात आला आहे...

Maharashtra Times 19 Jul 2018, 4:00 am

धरणातील विसर्ग घटला

पावसाने विश्रांती घेतल्याने गंगापूर आणि दारणातून विसर्ग कमी करण्यात आला आहे. गेल्या चार दिवसांपासून शहरात संततधार पाऊस सुरू होता. सोमवारी पावसाचा जोर कमी होत मंगळवारी तो अधिकच ओसरला. विशेष म्हणजे तब्बल चार दिवसांनंतर सुर्यदर्शन झाल्याने शहरवासी सुखावले. मंगळवारपासून बुधवारी सकाळपर्यंत जिल्ह्यात ३७६ मिलीमीटर पाऊस पडला. पेठमध्ये ९८ मिमी, इगतपुरी ८८, सुरगाणा ७१, त्र्यंबकेश्वरला ४९ तर नाशिक तालुक्यात २८.४ मिलीमीटर पाऊस नोंदविण्यात आला. सिन्नरमध्ये १५.४, दिंडोरीत १२, कळवणमध्ये ६ तर निफाडमध्ये ४.३ मिलीमीटर पाऊस नोंदविण्यात आला. पावसाचा जोर ओसरल्याने धरणांमधील विसर्गही कमी करण्यात आला आहे. गंगापूर धरणातून १५०० क्युसेकने तर दारणा धरणातून ११०० क्युसेकने विसर्ग सुरू होता.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज