म. टा. वृत्तसेवा, निफाड
ताडपत्री बांधण्यासाठी ट्रकवर चढलेल्या चालकाचा पाय घसरून खाली पडल्याने मृत्यू झाला. साधूशरण राय (रा. जबलपूर, जि. वैशाली, बिहार) असे या चालकाचे नाव आहे. कसबे सुकेणे येथे एम. के. कुरेशी पेट्रोल पंप येथे सोमवारी (दि. २३) रात्री दीड वाजता ही घटना घडली. साधूशरण खाली पडल्याने त्याचा अतिरक्तस्राव झाल्याने जागेवरच मृत्यू झाला. याबाबत पेट्रोल पंपचे मालक कुरेशी यांनी ओझर पोलिस स्टेशनला कळविले. पोलिस स्टेशनमध्ये आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.