नाशिक : इंदिरानगर परिसरातील चार्वाक चौकात दोन दुचाकींच्या अपघातात दुचाकीस्वार मनपाचे कर्मचारी राम प्रभाकर कपोते (वय ४७) यांचा मृत्यू झाला. अपघाताची घटना शुक्रवारी (दि.२२) रात्री घडली होती. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री साडेनऊच्या सुमारास कपोते दुचाकीने (एमएच १५/सीडी २८७२) चार्वाक चौकातून जॉगिंग ट्रॅककडे जात असताना अपघात झाला. गजानन महाराज मार्गाने जात असताना कपोते आणि दुचाकी क्रमांक एमएच १५ बीबी ४९३३ यांच्यात धडक झाली. कपोते यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांना खासगी रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. कपोते यांच्या मागे पत्नी व दोन मुले असा परिवार आहे.
दुचाकीस्वाराचा मृत्यू
इंदिरानगर परिसरातील चार्वाक चौकात दोन दुचाकींच्या अपघातात दुचाकीस्वार मनपाचे कर्मचारी राम प्रभाकर कपोते (वय ४७) यांचा मृत्यू झाला...
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 24 Nov 2019, 4:00 am