अ‍ॅपशहर

खताच्या दुकानाला देवळ्यात आग

देवळा येथील बाजार समितीच्या गाळ्यांमधील आनंद अॅग्रो या बियाणे व खतांच्या दुकानाला सोमवारी पहाटे आग लागली. या आगीत २५ लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.

Maharashtra Times 18 Jul 2017, 4:00 am
म. टा. वृत्तसेवा, कळवण
महाराष्ट्र टाइम्स.कॉम deola shop fire
खताच्या दुकानाला देवळ्यात आग


देवळा येथील बाजार समितीच्या गाळ्यांमधील आनंद अॅग्रो या बियाणे व खतांच्या दुकानाला सोमवारी पहाटे आग लागली. या आगीत २५ लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. शॉर्टसर्किटमुळे हा अपघात झाला.

बाजार समितीचे संचालक जगदीश पवार यांचे हे दुकान आहे. ते रविवारी रात्री आठ वाजता दुकान बंद केले. सोमवारी पहाटे तीन वाजता कळवण रस्त्यावरील संजय आहेर यांच्या घराकडे चोर आल्याचा संशयामुळे परिसरातील नागरिक सतर्क झाले होते. त्यातच बाजार समितीच्या गाळ्यांमध्ये आग लागल्याचे प्रदीप आहेर यांच्या लक्षात आले. त्यांनी तत्काळ देवळा पोल‌िस ठाण्यासह पवार यांनाही कळविले. पोल‌िस निरीक्षक गुलाबराव पाटील यांनी घटनास्थळी धाव घेऊन सटाणा अग्निशमन दलाला फोन बोलावून घेतले. तोपर्यंत परिसरातील नागरिकांनी खासगी टँकरच्या मदतीने आग विझविण्याचा प्रयत्न केला. पहाटे साडेचार वाजता सटाणा येथील अग्निशमन बंब पोहोचले. तब्बल चार तासांच्या प्रयत्नानंतर सकाळी साडेसात वाजता आग आटोक्यात आली. आगीत दुकानातील खतांसह जवळपास २५ लाखांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज