अ‍ॅपशहर

बायको माहेरी; नवरोजी ढाब्यावरी!

दिवाळसणातील सुट्ट्यांमुळे बहुतांशी महिलांना माहेरी जातात असल्याने तळीराम नवरोजींना काहीशी मोकळीक मिळते. बायकोच्या हजेरीत धाकापोटी ‘पिण्या’वर मर्यादा येते. मात्र, दिवाळीत तिच्या गैरहजेरीत मनसोक्त पिण्याची हौस भागवून घेण्यावर अनेक तळीराम नवरोजींचा भर असतो. त्यामुळे सध्या धाब्यावर केवळ सांयकाळीच नव्हे तर सकाळपासून तळीरामांची गर्दी दिसत आहे.

Maharashtra Times 23 Oct 2017, 4:34 pm
रामनाथ माळोदे, पंचवटी
महाराष्ट्र टाइम्स.कॉम drunker husband
बायको माहेरी; नवरोजी ढाब्यावरी!


दिवाळसणातील सुट्ट्यांमुळे बहुतांशी महिलांना माहेरी जातात असल्याने तळीराम नवरोजींना काहीशी मोकळीक मिळते. बायकोच्या हजेरीत धाकापोटी ‘पिण्या’वर मर्यादा येते. मात्र, दिवाळीत तिच्या गैरहजेरीत मनसोक्त पिण्याची हौस भागवून घेण्यावर अनेक तळीराम नवरोजींचा भर असतो. त्यामुळे सध्या ​ ढाब्यावर केवळ सांयकाळीच नव्हे तर सकाळपासून तळीरामांची गर्दी दिसत आहे.

भारतीय सणांमध्ये सर्वात मोठा असलेला दिवाळी हा प्रकाशाचा, उत्साहाचा आणि आनंदाचा सण म्हणून ओळखला जातो. वसुबारस, नरकचतुदर्शी, लक्ष्मीपूजन, दिवाळी पाडवा, भाऊबीज अशा विविध सणांची पर्वणी असलेल्या या सणातील भाऊबीजेला लग्न झालेली प्रत्येक स्त्री माहेरी जात असते. तिच्या गैरहजेरीत मद्यमानाचे शौकीन असलेले नवरोजी आपल्या मित्रमंडळीसह आनंद लुटीत आहेत.

शाळांना सुट्टी असल्याने महिलांना माहेरी काही दिवस राहणे शक्य होत असल्यामुळे त्यांचा मुक्काम वाढतो. तळीराम तर याच दिवसांची प्रतीक्षा करीत असतात. इतर दिवशी काही झाले तरी बायकोच्या धाकामुळे त्यांचे पिण्याचे प्रमाण कमीच असते. आनंद असो की दुःख ‘पिनेवालो की पिनेका बहाना चाहिए’ या गीताप्रमाणे दिवाळीत आनंद साजरा करताना मद्यप्राशन करण्यावर त्यांचा भर असतो. तळीरामांच्या तर रोजच्या बोलण्यात मद्यपानाच्या गोष्टींचा समावेश असल्याचे दिसते. त्यांच्या बोलण्यात मद्यपानाच्या बाबतीच्या शब्दांचा सर्वसाधारण बोलण्यातही वापर करीत असल्याचे दिसते. त्यात क्वार्टर, हाफसाईज, खंबा, सिक्स्टी, नाईन्टी असे शब्द त्यांच्या तोंडून सहज निघत असतात.


धम्माल ‘सोशल’ चर्चा

सुटीच्या दिवसात दरवर्षी हॉटेल, बार, धाबे यांच्यात तळीराम नवरोजींची हमखास गर्दी होत असल्याचा हॉटेलचालकांचा अनुभव आहे. तेच चित्र यंदाही दिसते. सोशल मीडियावरदेखील या विषयाच्या पोस्ट आडिओ, व्हिडीओ, टाईप केलेल्या मजकूरासह व्हायरल होत आहेत. ‘मेरी बिबी मईके गई’ या गाण्यावर नवरोजी बेडवरच धम्माल नाचत असल्याच्या व्हिडोओने चांगलेच मनोरंजन केले आहे. सोशल मिडियावर सध्या हाच विषय मोठा चर्चेचा ठरत आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज