नाशिकरोड : महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेना राज्य उपचिटणीसपदी नाशिकरोडचे बंटी कोरडे यांची नियुक्ती झाली आहे. संघटनेचे अध्यक्ष डॉ. मनोज चव्हाण यांनी मुंबईत नियुक्तीचे पत्र दिले. यावेळी राज्य पदाधिकारी मनोज रामराजे उपस्थित होते. कोरडे हे मनसेचे विधानसभा अध्यक्ष असून, त्यांनी मनविसेचे जिल्हाध्यक्ष, विभाग अध्यक्ष म्हणूनही काम केले आहे. मनसेने शेतकरी, ग्रामीण जनता, बेरोजगारी या प्रश्नांना प्राधान्य दिले असून, त्यादृष्टीने ही नियुक्ती करण्यात आली आहे.
मनसेच्या राज्य उपचिटणीसपदी कोरडे
महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेना राज्य उपचिटणीसपदी नाशिकरोडचे बंटी कोरडे यांची नियुक्ती झाली आहे संघटनेचे अध्यक्ष डॉ...
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 1 Nov 2019, 4:00 am