अ‍ॅपशहर

एक कोटीची उलाढाल ठप्प; माथाडी कामगारांच्या संपाचा बाजार समितीवर परिणाम

जिल्ह्यातील इतर बाजार समितींच्या तुलनेत नाशिक बाजारात कांदा-बटाट्याचे व्यवहार कमी प्रमाणात होतात. त्यामुळे या बंदचा नाशिक मार्केटमध्ये फारसा फटका बसला नाही.

Edited byम. टा. प्रतिनिधी | महाराष्ट्र टाइम्स 2 Feb 2023, 12:44 pm
पंचवटी : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पेठरोड येथील कांदा-बटाटा मार्केटमधील खरेदी-विक्रीचे व्यवहार माथाडी कामगारांच्या संपामुळे बुधवारी थंडावले. दिवसभरात सुमारे एक कोटी रुपयांची उलाढाल ठप्प झाल्याचे बाजार समितीच्या सूत्रांनी सांगितले. भाजीपाल्याच्या खरेदी-विक्रीच्या व्यवहारावर या संपाचा मात्र परिणाम झाला नाही.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम mathadi worker nashik
एक कोटीची उलाढाल ठप्प; माथाडी कामगारांच्या संपाचा बाजार समितीवर परिणाम


माथाडी कामगारांच्या प्रलंबित मागण्यासाठी महाराष्ट्र राज्य माथाडी, ट्रान्सपोर्ट आणि सर्वसाधारण कामगार युनियनने पुकारलेल्या एकदिवशीय लाक्षणिक बंदमध्ये पेठरोडच्या शरदचंद्र पवार मार्केटमधील हमाल व मापारी सहभागी झाले. त्यांनी मागण्या पूर्ण करा, अशी घोषणाबाजी केली. अन्यथा बेमुदत बंद करण्याचा इशारा त्यांनी दिला. जिल्ह्यातील इतर बाजार समितींच्या तुलनेत नाशिक बाजारात कांदा-बटाट्याचे व्यवहार कमी प्रमाणात होतात. त्यामुळे या बंदचा नाशिक मार्केटमध्ये फारसा फटका बसला नाही. पेठरोडच्या मार्केटमधील संपात संजय लाडे, सुभाष इंगळे, दिलीप सापटे, संतोष पगारे, संतोष कनकुसे, संजय जाधव, दत्ता जाधव, रवींद्र सोनवणे, सुनील थोरे आदी सहभागी झाले.

राज्य सरकारने विविध माथाडी मंडळांची पुनर्रचना करून त्यावर युनियनच्या सदस्यांच्या नेमणुका करणे गरजेचे आहे. विविध माथाडी मंडळांच्या कार्यालयीन सेवेत माथाडी कामगारांच्या मुला-मुलींना काम करण्याची संधी देण्यासंदर्भातही मागणी प्रलंबित आहे.- चंद्रकांत निकम,माजी हमाल-मापारी प्रतिनिधी, नाशिक बाजार समिती

महत्वाचे लेख