दुचाकी अपघातात महिलेचा मृत्यू
नाशिक : दुचाकीस कुत्रा आडवा आल्याने झालेल्या अपघातात महिलेचा मृत्यू झाला, तर पती जखमी झाला असल्याची घटना सातपूर परिसरात घडली. मथुराबाई बाळू जाधव (वय ४०, रा. दाढेगाव, ता. नाशिक) असे अपघातात मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. नवनाथ जाधव व मथुराबाई हे दुचाकीवरून महिरावणी येथून नाशिकच्या दिशेने येत होते. अपघातात गंभीर जखमी झालेल्या मथुराबाई यांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
...
दोघांना बेदम मारहाण
नाशिक : मागील भांडणाची कुरापत काढत दोघांना लोखंडी रॉड व दगडाने मारहाण करण्यात आल्याची घटना पेठरोड, मखमलाबाद परिसरात गुरुवारी (दि. ६) घडली. या प्रकरणी योगेश दिलीप करपे (वय २६, रा. रामकृष्णनगर, मखमलाबाद) याने तक्रार दिली आहे. गुरुवारी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास योगेश करपे व त्याचा मित्र अक्रम पठाण हे परिसरात सलून दुकानाबाहेर उभे होते. यावेळी संशयित आरोपी सूरज चारोस्कर व शार्दुल (पूर्ण नाव माहीत नाही) तेथे आले व मागील भांडणाची कुरापत काढत लोखंडी रोड व दगडाने मारहाण केली. यात फिर्यादीचे दोन्ही पाय व डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. या प्रकरणी म्हसरूळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.