अ‍ॅपशहर

नाशकात भररस्त्यात पोरींची 'दंगल'; थोबाडीत दिल्या, झिंज्या ओढल्या; पोरींना पाहून पोरं चेकाळली

girls fight in nashik on road: नाशिकच्या गंगापूर रोडवरील एका महाविद्यालयात विद्यार्थिनींमध्ये फ्री स्टाईल हाणामारी झाली आहे. या ठिकाणी चार मुली एकमेकींच्या झिंज्या ओढताना दिसत आहे. हाणामारीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. मुलींची हाणामारी चालू असताना महाविद्यालयाच्या इतरही विद्यार्थ्यांनी या ठिकाणी मोठी गर्दी केली होती.

Edited byकुणाल गवाणकर | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 18 Nov 2022, 2:40 pm
नाशिक: गंगापूर रोडवरील एका महाविद्यालयात विद्यार्थिनींमध्ये फ्री स्टाईल हाणामारी झाली आहे. या ठिकाणी चार मुली एकमेकींच्या झिंज्या ओढताना दिसत आहे. हाणामारीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. मुलींची हाणामारी चालू असताना महाविद्यालयाच्या इतरही विद्यार्थ्यांनी या ठिकाणी मोठी गर्दी केली होती. बघ्यांनी फ्रीस्टाईल हाणामारीचा व्हिडिओ मोबाईलमध्ये कैद केला आहे. हाणामारी करणाऱ्या विद्यार्थिनी अल्पवयीन असल्याची माहिती मिळाली आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम girls fight


विद्यार्थिनींमध्ये झालेल्या हाणामारीमागचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. मात्र समाज माध्यमांवर मुलींमधील या 'दंगल'चा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. व्हिडिओ पाहिला तर हा सर्व प्रकार महाविद्यालयाच्या कॅम्पसमध्ये घडलेला असावा असे दिसून येत आहे. त्यामुळे महाविद्यालयातच झालेल्या या प्रकारामुळे शिक्षक किंवा कर्मचारी हा सर्व प्रकार घडत असताना कुठे होते असा प्रश्न उपस्थित झाला आहे. व्हिडिओमध्ये दोन विद्यार्थिनींमध्ये सुरू असलेले भांडण सोडवण्याऐवजी घटनास्थळी उपस्थित विद्यार्थी त्याचा व्हिडिओ बनवताना दिसत आहे.
आँख बंद टपली महागात पडली! मित्रांना रात्री खेळ सुरू केला अन् होत्याचं नव्हतं झालं
या आधीही नाशिकमध्ये विद्यार्थिनींच्या मारामारीचे असेच व्हिडिओ समोर आले आहेत. नाशिकमधील एका महाविद्यालयात दोन विद्यार्थिनींमध्ये किरकोळ कारणावरून भांडण झाले होते. शाळेच्या मैदानात दोघांमध्ये जोरदार मारामारी झाली. ही फ्री स्टाईल फाईट कॅमेऱ्यात कैद झाली होती आणि त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. नाशिकच्या कॅनडा कॉर्नर परिसरातील एका नामांकित महाविद्यालयाच्या पटांगणात ही घटना घडली होती. त्यावेळीही दोन विद्यार्थिनींमध्ये सुरू असलेली भांडणे सोडवण्याऐवजी घटनास्थळी उपस्थित विद्यार्थी त्याचा व्हिडिओ बनवत होते. मात्र काही वेळाने दोघांचे काही मित्र पुढे आले आणि त्यांनी दोघांना वेगळे केले. या घटनेचा व्हिडिओ समोर आल्यानंतर कॉलेजने दोघांनाही ताकीद देऊन सोडले होते. दरम्यान आता पुन्हा असाच एक हाणामारीचा व्हिडिओ समोर आला आहे. यामुळे आता कॉलेजच्या कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असून सदर महाविद्यालय प्रशासन काय पाऊल उचलणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
लेखकाबद्दल
कुणाल गवाणकर
महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईनमध्ये सिनियर डिजिटिल कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. ११ वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. सकाळ, जय महाराष्ट्र, टीव्ही ९ मराठी, लोकसत्ता ऑनलाईन, न्यूज१८ लोकमत, लोकमत ऑनलाईनमधून प्रवास करत मटा ऑनलाईनपर्यंत वाटचाल; क्राईमच्या बातम्यांमध्ये हातखंडा; राजकीय, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस.... आणखी वाचा

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज