अ‍ॅपशहर

कुसुमाग्रज स्मारकात पहिला संस्कृत चित्रपट

कुसुमाग्रज प्रतिष्ठान आणि दादासाहेब फिल्म सोसायटी यांच्यातर्फे 'आदि शंकराचार्य' हा संस्कृत भाषेतील पहिला चित्रपट गुरुवारी (दि...

Maharashtra Times 20 Nov 2018, 4:00 am

नाशिक : कुसुमाग्रज प्रतिष्ठान आणि दादासाहेब फिल्म सोसायटी यांच्यातर्फे 'आदि शंकराचार्य' हा संस्कृत भाषेतील पहिला चित्रपट गुरुवारी (दि. २२) सायंकाळी ६ वाजता सादर होणार आहे.

हिंदू तत्त्वज्ञान अद्वैत वेदांताचा पुरस्कार करणारे आदि शंकराचार्य यांच्या जीवनावर आधारित या संस्कृत भाषेतील चित्रपटाची निर्मिती एनएफडीसीने केली असून, जी. व्ही. अय्यर यांनी दिग्दर्शन केले आहे. 'आदि शंकराचार्य' ला ३१ व्या राष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट चित्रपट, पटकथा, छायालेखन आणि ध्वनिलेखन अशी चार पारितोषिके मिळाली होती. हिमालयाचे अपूर्व आणि अनोखे निसर्गदर्शन या चित्रपटात आहे. हा चित्रपट संस्कृत भाषेतील असला तरी इंग्रजी भाषेतील सबटायटलची जोड त्यास देण्यात आलेली आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज