निफाड : यवतमाळ येथील जिल्हा क्रीडा संकुलात झालेल्या राज्यस्तरीय शालेय थ्रो बॉल स्पर्धेतील उत्तम कामगिरीच्या आधारे प्रियंका योगेश घोटेकर हिची १९ वर्षांखालील महाराष्ट्राच्या संघात निवड झाली आहे. ती खेडलेझुंगे येथील पी. टी. विद्यालयाची विद्यार्थिनी असून, विभागीय कर्णधारपदाची धुराही तिने सांभाळली आहे. दिल्ली येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करेल. क्रीडाप्रमुख विलास निरभवणे, भारती पगारे, मुख्याध्यापक एस. सी. रहाटळ, जी. एस. कोकाटे यांनी तिला मार्गदर्शन केले.
घोटेकर महाराष्ट्र संघात
यवतमाळ येथील जिल्हा क्रीडा संकुलात झालेल्या राज्यस्तरीय शालेय थ्रो बॉल स्पर्धेतील उत्तम कामगिरीच्या आधारे प्रियंका योगेश घोटेकर हिची १९ वर्षांखालील ...
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 16 Nov 2019, 4:00 am