अ‍ॅपशहर

रेल्वे स्टेशनवरून युवती बेपत्ता

नाशिकरोड रेल्वे स्टेशनवर गाडीमध्ये चढताना आपली १७ वर्षीय मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार ज्योती प्रकाश कुलकर्णी (५२, रा. रेल्वे ट्रॅक्शन कॉलनी, एकलहरे) यांनी नाशिकरोड रेल्वे पोलिस ठाण्यात दिली आहे.

Maharashtra Times 11 Jul 2017, 3:36 am
नाशिकरोड : नाशिकरोड रेल्वे स्टेशनवर गाडीमध्ये चढताना आपली १७ वर्षीय मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार ज्योती प्रकाश कुलकर्णी (५२, रा. रेल्वे ट्रॅक्शन कॉलनी, एकलहरे) यांनी नाशिकरोड रेल्वे पोलिस ठाण्यात दिली आहे. त्यांनी मधुकर करोशिया (२८, क्रांतीनगर, मनमाड) याच्यावर संशय व्यक्त केला आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम girl missing from nashik road
रेल्वे स्टेशनवरून युवती बेपत्ता


कुलकर्णी या १४ नोव्हेंबर २०१६ रोजी पाचोऱ्याला जाण्यासाठी कन्या वैष्णवी व मुलगा अभिषेक यांच्यासह नाशिकरोड रेल्वे स्टेशनवर आल्या. कामयानी एक्स्प्रेसमध्ये चढताना गर्दीमुळे वैष्णवी त्यांना दिसली नाही. परिसरात व नातेवाइकांकडे शोध घेऊनही ती सापडली नाही. त्यामुळे त्यांनी नाशिकरोड रेल्वे पोलिसांत बेपत्ताची तक्रार दाखल. या प्रकरणी त्यांनी मधुकरवर संशय व्यक्त केला आहे. सहाय्यक निरीक्षक नितीन पवार यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक एस. एस. सोनवणे तपास करत आहेत.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज