सातपूर : गोदावरी नदीला पावसाळ्यात आलेल्या पुरात सातपूर गावातील रहिवासी रतन आहेर वाहून गेले होते. कपालेश्वर मंदिरात दर्शनासाठी गेलेले आहेर पुराचे पाणी बघत असताना, वाहून गेल्याची घटना घडली होती. याबाबत पश्चिम विधानसभेच्या आमदार सीमा हिरे यांनी आहेर कुटुंबाला मदत मिळावी, यासाठी पाठपुरावा केला. पहिल्या टप्प्यात चार लाखांचा धनादेश देण्यात आला होता. यानंतर दोन लाखांचा धनादेश शासनाच्या मदतीने मयत रतन यांच्या पत्नी अचर्ना आहेर यांना आमदार हिरे व महसूल विभागाकडून देण्यात आला.
आहेर कुटुंबाला शासनाकडून मदत
गोदावरी नदीला पावसाळ्यात आलेल्या पुरात सातपूर गावातील रहिवासी रतन आहेर वाहून गेले होते...
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 15 Jan 2020, 4:00 am