अ‍ॅपशहर

शेतकऱ्यांसाठी सरसावली शासकीय यंत्रणा

म टा...

Maharashtra Times 17 Jul 2018, 4:00 am

म. टा. वृत्तसेवा, येवला

जिल्हा बँकेने कर्जासाठी हतबलता व्यक्त केल्यानंतर शेतकऱ्यांना राष्ट्रीयीकृत बँकांमार्फत कर्जपुरवठा व्हावा, यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशान्वये शासकीय यंत्रणा पुढे सरसावली आहे. यामुळे पीक कर्जासाठी आसुसलेल्या शेतकऱ्यांना मोलाचा दिलासा मिळणार आहे.

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार तालुक्याच्या तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली प्रत्येक तालुक्यात तालुकास्तरीय समिती गठीत केली आहे. यातून शेतकऱ्यांना खरीप पीककर्ज उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने महसूल, सहकार व ग्रामविकास यंत्रणा संयुक्तरित्या थेट शेतकऱ्यांच्या दारी जाऊन अर्ज, आवश्यक कागदपत्रे भरून घेणार असल्याने शेतकऱ्यांना सहकार्य मिळणार आहे. येवला तहसीलदार नरेशकुमार बहिरम यांनी तहसील कार्यालयात तालुक्यातील तलाठी, ग्रामसेवक व सोसायट्यांचे सचिव यांची विशेष बैठक घेतली. येवला तालुक्यात विविध राष्ट्रीयकृत बँकांच्या एकूण १५ शाखा असून, त्यातील १३ शाखांमार्फत शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत, असे तहसीलदार बहिरम यांनी स्पष्ट केले. यावेळी सहकारी संस्थांचे सहाय्यक निबंधक एकनाथ पाटील, सहकार अधिकारी आर. पी. जाधव, विजय बोरसे, महाराष्ट्र बँकेचे येवला शाखा व्यवस्थापक सागर सोमासे यांच्यासह तालुक्यातील विविध राष्ट्रीयकृत बँकांचे शाखाधिकारी, प्रतिनिधी, महसूलचे मंडळ अधिकारी उपस्थित होते.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज