अ‍ॅपशहर

आयातकराची कोंडी सोडविणार

आयातकराची कोंडी सोडविणारखासदार राजू शेट्टी द्राक्ष निर्यातदारांना आश्वासनम टा...

Maharashtra Times 29 Jan 2018, 4:00 am
आयातकराची कोंडी सोडविणार
महाराष्ट्र टाइम्स.कॉम pimplegaon news photo


खासदार राजू शेट्टी द्राक्ष निर्यातदारांना आश्वासन

म. टा. वृत्तसेवा, पिंपळगाव बसवंत

नाशिक जिल्ह्यातून बांगलादेशात खूप मोठ्या प्रमाणावर द्राक्ष रवाना होतात. यंदा बांगलादेशाने द्राक्षावर आयातकर लावल्यामुळे शेतकऱ्यांची कोंडी झाली असून, बाजारभाव कमालीचे घसरले आहे, असे गाऱ्हाणे द्राक्ष निर्यातदारांनी खासदार राजू शेट्टी यांच्यासमोर मांडले. यावर खासदार शेट्टी यांनी द्राक्ष उत्पादकांच्या समस्या समजून घेत लवकरच शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ घेऊन दिल्ली येथे संबंधित मंत्री व अधिकाऱ्यांसोबतसमवेत चर्चा करण्याची ग्वाही दिली.

पिंपळगाव बसवंतजवळील चिंचखेड येथील मान्सून द्राक्ष निर्यात युनिटला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, खासदार राजू शेट्टी यांनी नुकतीच भेट दिली. या वेळी परिसरातील द्राक्ष उत्पादकांनी निर्यातीसह द्राक्ष शेतीबाबतच्या समस्या त्यांच्यासमोर मांडल्या.

बांगलादेशात द्राक्ष निर्यात झाली तर द्राक्षांना मोठी मागणी होते व चांगला भाव शेतकऱ्यांना मिळतो. याशिवाय परप्रांतातून नाशिक जिल्ह्यात द्राक्ष खरेदीसाठी येणाऱ्या व्यापाऱ्यांना पणन मंडळाचे परवाने सक्तीचे करावे यामुळे शेतकऱ्यांची रक्कम सुरक्षित होईल व व्यापारी पळून जाण्यावर नियंत्रण येईल, असेही यावेळी सांगण्यात आले. या वेळी संघटनेचे युवा प्रदेशाध्यक्ष हंसराज वडघुले, जिल्हाध्यक्ष गोविंद पगार, प्रांतिक सदस्य साहेबराव मोरे, संदीप जगताप, प्रवीण संधान, गंगाधर निखाडे आदी उपस्थित होते.

द्राक्षनिर्यात युनिटची पाहणी

बेदाण्यावर लावलेला भरमसाठ जी. एस.टी. रद्द करावा. नवीन सुधारित द्राक्ष जातींचे संशोधन करण्यासाठी अत्याधुनिक संशोधन केंद्र उभारावे, सध्याची किचकट पीकविमा पद्धतीत बदल करावा, शेती औषधांच्या एमआरपी नियंत्रित कराव्या, विद्राव्य खतांना अनुदान मिळावे, द्राक्षांना योग्यवेळी धरणातून पाणीपुरवठा व्हावा आणि 'अपेडा' या संस्थेकडून द्राक्ष अवशेष अहवाल मिळण्यास विलंब होतो. त्यामुळे या अहवालाची प्रत इमेल किंवा एसएमएस द्वारे शेतकऱ्यांना मिळावी अशा विविध मागण्या यावेळी मांडण्यात आल्या. खासदार शेट्टी यांनी द्राक्ष निर्यात युनिटची प्रत्यक्ष पाहणी करून संपूर्ण प्रक्रिया समजून घेतली.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज