सिडको : त्रिमूर्ती चौक परिसरातील दुर्गानगर येथील श्री महालक्ष्मी मंगल कार्यालयाच्या आवारात एक पत्र्याचे शेड बांधून त्याचा अनधिकृतरित्या वापर सुरू होता. महापालिकेच्या अतिक्रमण पथकाने मंगळवारी कारवाई करून हे अतिक्रमण जमीनदोस्त केले. ही मोहीम मनपा आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमणचे उपायुक्त जयश्री सोनवणे, विभागीय अधिकारी सोमनाथ वाडेकर, महेंद्र पगारे, गोकुळ पगारे आदींनी राबविली. यावेळी नो हॉकर्स झोन, सार्वजनिक रस्ते, फूटपाथ, चौक आदी ठिकाणी अतिक्रमण करून व्यवसाय करणाऱ्यांवर अशाच प्रकारची कडक कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा मनपा अधिकाऱ्यांना दिला.
‘महालक्ष्मी’च्या अतिक्रमणावर हातोडा
त्रिमूर्ती चौक परिसरातील दुर्गानगर येथील श्री महालक्ष्मी मंगल कार्यालयाच्या आवारात एक पत्र्याचे शेड बांधून त्याचा अनधिकृतरित्या वापर सुरू होता...
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 31 Jul 2019, 4:00 am