अ‍ॅपशहर

कवी विष्णू खरे यांचे काव्यवाचन

नाशिकच्या वाचनसंस्कृतीला नित्य नवी झळाळी देणाऱ्या सार्वजनिक वाचनालयाच्या शतकोत्तर अमृतमहोत्सवी सोहळा रविवारी (दि. २४ जुलै) रोजी साजरा होणार आहे. यानिमित्त वाचनालयाच्या औरंगाबादकर सभागृह येथे सायंकाळी ६.१५ वाजता ख्यातनाम हिंदी कवी व समीक्षक विष्णू खरे यांचे काव्यवाचन आणि त्यांच्याशी संवाद असा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे.

Maharashtra Times 24 Jul 2016, 4:00 am
नाशिक : नाशिकच्या वाचनसंस्कृतीला नित्य नवी झळाळी देणाऱ्या सार्वजनिक वाचनालयाच्या शतकोत्तर अमृतमहोत्सवी सोहळा रविवारी (दि. २४ जुलै) रोजी साजरा होणार आहे. यानिमित्त वाचनालयाच्या औरंगाबादकर सभागृह येथे सायंकाळी ६.१५ वाजता ख्यातनाम हिंदी कवी व समीक्षक विष्णू खरे यांचे काव्यवाचन आणि त्यांच्याशी संवाद असा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम hindi known poet vishnu khare in nashik
कवी विष्णू खरे यांचे काव्यवाचन


या कार्यक्रमात विष्णू खरे यांच्याशी संवाद साधण्यासाठी प्रसिद्ध मराठी कवी प्रफुल्ल शिलेदार यांची उपस्थिती राहणार आहे. हिंदी कवी व समीक्षक विष्णू खरे यांना आतापर्यंत साहित्य क्षेत्रातील विविध राष्ट्रीय सन्मानाने गौरविण्यात आले आहे. तरी या कार्यक्रमास नाशिककर नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन सार्वजनिक वाचनालयाच्यावतीने आयोजकांनी केले आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज