अ‍ॅपशहर

नात्याला काळीमा! नराधम बापाकडून चिमुकल्यांचा अमानुष छळ

आपल्या दोन लहान मुलांना बेदम मारहाण करणाऱ्या व त्यांचा छळ करणाऱ्या नराधम बापाविरुद्ध नाशिकमधील इगतपुरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Authored byटीम मटा ऑनलाइन | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 18 Jan 2021, 8:18 am
म. टा. खास प्रतिनिधी । नाशिक
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Rahul-More


आईचं छत्र हरपलेल्या दोन लहान मुलांवर त्यांच्या पित्याकडून अनन्वित अत्याचार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार इगतपुरी तालुक्यात घडला आहे. विशेष म्हणजे हा अत्याचारी बाप रेल्वे पोलिसामध्ये कार्यरत आहे. राहुल विजय मोरे असं त्याचं नाव आहे. (Nashik Crime News)

वाचा: नगरमध्ये लसीकरणानंतर तीन परिचारिकांना त्रास, आयसीयूमध्ये उपचार

जन्मदात्या बापाचा अत्याचार सहन करणाऱ्या या मुलांच्या आईचा काही दिवसांपूर्वीच मृत्यू झाला. दुर्दैवानं या मुलांना जीव लावणाऱ्या आजीवरही काळानं घाला घातला. त्यामुळं त्या लहान बाळाकडं लक्ष देण्यासाठी कोणीच नव्हतं. मुलांची जबाबदारी खांद्यांवर पडलेल्या बापानं दुसरं लग्न केलं. त्यानंतर दिवसेंदिवस मुलांचे हाल वाढत गेले. पोलीस बापाकडून मुलांना जबर मारहाण सुरू झाली. आज या नराधम बापानं हद्द केली. मुलांना काठीनं व हातानं जबर मारहाण केली.

वाचा: महेश मांजरेकर यांच्याविरोधात शिवीगाळ व दमदाटीची तक्रार

घटनेची माहिती मिळाल्यानंतर काही कार्यकर्त्यांनी मुलांना सिव्हिल हॉस्पिटल उपचारासाठी दाखल केलं आहे. मुलांना प्रचंड मारहाण झाली असून, ते घाबरले असल्याचं जवळच्या नातेवाईकानी सांगितलं. या प्रकरणी राहुल मोरे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वाचा: अण्णाचं आंदोलन रोखण्यासाठी भाजपचे आटोकाट प्रयत्न

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज