अ‍ॅपशहर

कार अपघातात घोटीचा तरुण ठार

कार अपघातात घोटीचा तरुण ठार घोटी : मुंबई-नाशिक महामार्गावर मुंढेगाव शिवारात शनिवार (दि...

Maharashtra Times 16 Dec 2018, 4:00 am

कार अपघातात

घोटीचा तरुण ठार

घोटी : मुंबई-नाशिक महामार्गावर मुंढेगाव शिवारात शनिवार (दि. १५) दुपारी एक वाजेच्या सुमारास झालेल्या कार अपघातात टाके-घोटी येथील तरुण जागीच ठार झाला. अपघातातील दुसरा तरुण गंभीर जखमी झाल्याने त्याला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मुंढेगाव चौफुलीवर नाशिकमार्गे घोटीकडे जाणारी अज्ञात वाहनाने हुलकावणी दिल्याने कार दुभाजकावर चढून पलटी झाली. या अपघातात टाके-घोटी येथील पांडुरंग लहानु भगत (वय २६) हा जागीच ठार झाला तर शंकर भोगीलाल नाठे (वय २८) हा गंभीर जखमी झाला.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज